Travel tips : भारतातील काही अशा जागा, फुकट खाण्यासोबत व राहण्याबाबत मिळतील अनेक सुविधा

बजेट प्लानिंग करताय तर भारतातील या जागांविषयी जाणून घ्या.
Travel tips, Follow this tips if you are going trip, Travel tips and tricks
Travel tips, Follow this tips if you are going trip, Travel tips and tricksब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : फिरायला जाताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. कोणत्या ठिकाणी जायचे यापासून ते होणारा खर्च व मिळणाऱ्या सुख सुविधाबाबत आपल्याला अनेक प्रश्न पडलेले असतात.

हे देखील पहा -

आपल्याला नेहमी कमी खर्चात पण चांगल्या ठिकाणी फिरायला जायचे असते. बजेट ट्रॅवलिंगमध्ये आपल्याला कुठेही राहण्याचा ठिकाणी अधिक खर्चाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ऑफ सीझनमध्ये हे शक्य आहे कारण या काळात पर्यटन स्थळांवर कमी लोक येत असल्यामुळे हॉटेल्स त्यांचे दर कमी करतात. तर, ऑन-सीझनमध्ये हे दर अधिक जास्त असतात. यासाठी जर आपल्याला बजेट प्रवास करायचा असेल आणि मुक्कामासाठी जास्त पैसे गुंतवायचे नसतील, तर आपण अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे आपण विनामूल्य राहू शकता आणि आपण संपूर्ण ट्रिपचा (Trip) आनंद घेऊ शकता. भारतात अशा अनेक धर्मशाळा आणि आश्रम आहेत जिथे राहण्यासाठी आपल्याकडून पैसे (Money) घेतले जात नाहीत. आज आपण अशा काही जागाबद्दल माहित करुन घेणार आहोत ज्यामुळे आपला खर्च कमी होईल व प्रवासाचा आनंद आपल्याला लुटता येईल.

१. कोयंबतूरपासून ४० किमी अंतरावर ईशा फाउंडेशन आहे. हे सद्गुरूंचे धार्मिक केंद्र असून जिथे आदियोगी शिवाची एक अतिशय सुंदर आणि मोठी मूर्ती आहे. हा एक केंद्र योग असून पर्यावरण आणि सामाजिक कार्य क्षेत्रासाठी काम करते. आपण इथे पैसे देऊ शकतात किंवा विनामूल्य राहू शकता.

Travel tips, Follow this tips if you are going trip, Travel tips and tricks
Travel tips : पावसाळ्यात फिरायला जाताय तर, असा करा प्रवास अविस्मरणीय !

२. आपण हिमाचल प्रदेशला भेट देणार असू तर आपण मणिकरण साहिब गुरुद्वारामध्ये मोफत राहू शकतो. येथे आपल्याला मोफत पार्किंग आणि जेवण देखील मिळते. हा गुरुद्वारा पार्वती नदी जवळ स्थित आहे.

३. केरळच्या सुंदर टेकड्या आणि हिरवाईच्या मधोमध आनंदाश्रमात राहणे हा एक वेगळा अनुभव असू शकतो. आपण या आश्रमात मोफत राहू शकतो. आश्रमात आपल्याला दिवसातून तीन वेळा जेवण दिले जाते, जे खूप कमी मसाल्यांनी तयार केले जाते.

४. ऋषिकेशमध्ये पवित्र गंगा नदीच्या काठी वसलेल्या गीता भवनात प्रवासी विनामूल्य राहू शकतात. सोबतच इथे जेवणही मोफत दिले जाते. या आश्रमात सुमारे १००० अशा खोल्या आहेत जिथे जगभरातून लोक येतात आणि राहतात. आश्रमातर्फे सत्संग आणि योगासनेही दिली जातात.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com