PNB KYC Update : पीएनबी ग्राहकांनी 'हे' काम त्वरित करा; अन्यथा, खात्यातून पैसे काढणे होईल अशक्य !

12 डिसेंबर 2022 नंतर ज्या ग्राहकांचे KYC अपडेट केले जाणार नाही.
PNB KYC Update
PNB KYC Update Saam Tv

PNB KYC Update : पंजाब नॅशनल बँक सतत आपल्या ग्राहकांना केवायसी (नो युवर कस्टमर) अपडेट करण्यास सांगत आहे. 12 डिसेंबर 2022 नंतर ज्या ग्राहकांचे KYC अपडेट केले जाणार नाही. त्यांना त्यांच्या खात्यातून पैशांच्या व्यवहारात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना याबाबत सातत्याने माहिती देत ​​आहे. PNB ने म्हटले आहे की रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ग्राहकांनी त्यांचे KYC 12 डिसेंबर 2022 पर्यंत अपडेट करायला हवे अशी सुचना त्यांनी केली आहे.

PNB KYC Update
Home Loan : फक्त एका क्लिकवर लवकरच मिळणार पेपरलेस होम लोनची सुविधा; जाणून घ्या, कशी ?

बँकेने पाठवली नोटीस

पंजाब नॅशनल बँकेने गेल्या महिन्यात एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले होते की, ज्या ग्राहकांनी अद्याप त्यांचे केवायसी अपडेट केलेले नाही. त्याच्या घरी दोन नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्याच्या नोंदणीकृत मोबाईल (Mobile) क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत. बँकेने 20 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर या संदर्भात एक अधिसूचना देखील शेअर केली होती.

व्यवहार करताना येतील अनेक अडचणी

  • पंजाब नॅशनल बँकेनेही KYC अपडेट करण्यासाठी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अधिसूचना शेअर केली होती.

  • यामध्ये PNB ने लिहिले- 'जर तुमचे खाते 30.09.2022 पर्यंत KYC अपडेटसाठी देय असेल, तर तुम्हाला याबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे.

  • तुम्हाला 12.12.2022 पूर्वी तुमचे KYC अपडेट करण्यासाठी होम ब्राँचशी संपर्क साधण्याची विनंती केली जाते.

  • अपडेट न केल्यामुळे, तुमच्या खाते बंद केले जाऊ शकते.

ही कागदपत्रे आवश्यक आहेत

  • केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्ता पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागेल.

  • आपण ई-मेल पाठवून देखील हे कार्य पूर्ण करू शकता. यासोबतच बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी अपडेट करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली जाऊ शकते.

फसवणूक कॉलपासून सावध रहा

  • बँक (Bank) कोणत्याही ग्राहकाला केवायसी अपडेट करण्यासाठी कॉल करत नाही. जर तुम्हाला असे कॉल आले असतील तर लगेच समजून जा की, तो फसवणूकीचा कॉल असू शकतो. म्हणूनच अशा फोनच्या भानगडीत पडू नका.

  • बँकेचे म्हणणे आहे की, कोणत्याही ग्राहकाला केवायसी संबंधित समस्या असल्यास ते थेट बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

  • वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

  • पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा KYC अपडेट करण्यास सांगत असत. मात्र आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतरानंतरही ते अपडेट करण्यास सांगत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com