Potato Benefits : सुटलेल्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल बटाटा, असा कराल वापर

How To Loose Weight : वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक डायट चार्ट तयार करून त्या यादीत वजन कमी करणाऱ्या पदार्थाचा समावेश करता.
Weight Loss Tips
Weight Loss Tips Saam Tv

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते. म्हणून वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक डायट चार्ट तयार करून त्या यादीत वजन कमी करणाऱ्या पदार्थाचा समावेश करता.

पण तुम्हाला माहीत आहे का, कोणते पदार्थ पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी काही विशेष आहार घेण्याची गरज नाही. तुमच्या रोजच्या आहारातील एखादा अन्नपदार्थ तुमचे वजन झपाट्याने कमी करण्यासाठी फायदेशीर असतो.

Weight Loss Tips
Potato Consumption Causes Diabetes : बटाट्याच्या सेवनाने मधुमेह होतो ? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

बटाटा (Potatoes) वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर असू शकतो. जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि इतर अनेक पोषकघटक बटाट्यामध्ये आढळतात. बटाटा फक्त पोटावरील चरबीच कमी नाही करत, तर यासोबतच बटाटा पचनास देखील मदत करतो आणि कॅन्सरसारख्या आजाराचा (Disease) धोका कमी करण्यास मदत करतो.

त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी आरोगयासाठी बटाटा हा एक उत्तम पर्याय आहे. कारण बटाट्यात कमी कॅलरीज असतात. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बटाटा चांगला प्रयाय आहे. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याचे आरोग्याला होणारे फायदे आणि सेवन करण्याची पद्धत काय आहे.

Weight Loss Tips
Weight Loss In 10 Days : दहा दिवसांत वजन कमी करायचे आहे ? फक्त 'हे' काम करा, फरक जाणवेल

1. बटाट्यात आढळणारे पोषकतत्व

असे म्हटले जाते की, पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक असते. पांढऱ्या पदार्थामध्ये साखर, तांदूळ (Rice) आणि मीठ येतात. पण बटाटा पांढरा असो किंवा गोड, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. केळी पेक्षाही जास्त पोटॅशियम बटाट्यामध्ये असते. यासोबतच बटाट्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते आणि कॅलरीज देखील कमी असतात.

2. बटाटे खाण्याचे फायदे

  • तुम्ही फक्त साधा उकडलेला बटाटा जरी खाला तरी तुमचे पोट बराच वेळ भरून राहते परिणामी तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

  • अपचनाच्या समस्या दूर करण्यासाठी बटाटा उपयुक्त आहे. जाड लोकांना अपचनाच्या समस्या असतात. त्यामुळे बटाट्याचे सेवन करून तुम्हाला अन्नपदार्थ पचवण्यास मदत होते.

  • कॅन्सरचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याचे सेवन करू शकता. बटाट्यामुळे कॅन्सरचा धोका दूर राहण्यास मदत मिळते .

  • बटाट्यात असणारे संयुगे भूक नियंत्रण, इन्सुलिन, जळजळ आणि झोपेवर परिणाम करतात.

Weight Loss Tips
Yoga Benefits For Weight Loss : या योगासनांमुळे तुमचे वजन होऊ शकते झपाट्याने कमी

3. बटाटे खाण्याची पद्धत

  • अनेक आहारतज्ज्ञ आणि पोषकतज्ज्ञ असे सांगतात की, रोज भरपूर प्रमाणात बटाटे खायला पाहिजेत. जर तुम्ही बटाटे खाण्याच्या विचार करत असाल तर अशा वेळेस इतर कोणताही पदार्थाचा समावेश तुमच्या आहारात करू नका.

  • बटाटे खाण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्हाला उकडलेले बटाटे खायला आवडत नसतील तर तुम्ही बटाटे बेक करून खाऊ शकता.

  • टेस्टसाठी तुम्ही बटाट्यांमध्ये मीठ किंवा चार्टमसाला टाकून खाऊ शकता. लक्षात ठेवा बटाट्यांमध्ये जास्त मीठ टाकू नका

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com