
Which investment is best : गुंतवणूक करताना आपण अनेकदा कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे योग्य आहे याचा विचार करतो. गुतंवणूकीच्या वेळी त्यावर मिळणारा व्याजदर देखील तपासला जातो. गुंतवणूक करण्यासाठी बँक, म्युच्युल फंड, सोन-चांदी, पीपीएफ, शेअर्स यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात. जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे वाचा
पब्लिक प्रॉविडेंट फंड ही सरकारद्वारे सामान्य माणसासाठी लागू करण्यात आलेली एक गुंतवणूक (Investment) योजना आहे. ही लाँग टर्म गुंतवणूकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. तरी, गुंतवणूक करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊयात
1. PPF मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
पीपीएफ ही सरकारची (Government) योजना असून येथे तुम्हाला निश्चित स्वरुपात व्याज दिले जाते परंतु योजनेच्या व्याजदराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. त्याचबरोबर गरज भासल्यास व्याजदरात बदलही केले जाऊ शकतात.
'पब्लिक प्रॉविडेंट फंड' या योजनेअंतर्गत तुम्ही सध्या एप्रिल ते जून 2023 पर्यंत वार्षिक 7.1 टक्के व्याजदर मिळवून एक लाँग टर्म इनव्हेस्टमेंट करु शकता. या योजनेचा कालावधी 15 वर्षे इतका असून या योजनेचा रिटर्न तुम्हाला 15 वर्षांनंतर मिळणार आहे. 15 वर्षांसारख्या मोठ्या कालावधी असल्यामुळे लाँग टर्म गुंतवणूकीचा ही चांगला उपाय ठरु शकते. तसेच या योजनेत एका आर्थिक (Money) वर्षात जवळ-जवळ 1.5 लाख रुपये गुंतवणूक करु शकता. त्याचबरोबर गुंतवणूकीबरोबर तुम्हाला करबचतीचा ही फायदा मिळतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.