
Eggs Shortage News: महाराष्ट्रात सध्या थंडी जास्त प्रमाणात वाढली आहे. वाढत्या थंडीला पाहता आता अनेक व्यक्ती अंडी खाण्यावर भर देत आहेत. मात्र या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मागणी वाढली असली तरी अंड्यांच शॉर्टेज झालं आहे. सुमारे एक कोटी अंडी बाजारात कमी येत आहेत. पशुसंवर्धन विभागाने या बाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय पारकाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात थंडीमुळे अंडी खाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पशुसंवर्धन विभाग वाढत असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी असक्षम ठरले आहे. सध्या राज्यात २.२५ कोटी अंड्यांची गरज भासत आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्मसना अंड्यांचे उत्पादन वाढवण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा भरून काढण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांतून अंडी मागवली जात आहेत.
मागणीत वाढ आणि उत्पादनात घट झाल्याने अंड्यांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर याचा फटका बसत आहे. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाने पोल्ट्री फार्म व्यावसायिकांसाठी अनुदान स्वरूपात ५० पांढऱ्या लेघोर्न कोंबड्या आणि १००० पिंजरे म्हणजे एकूण २१ हजारांचे अनुदान देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला आहे.
औरंगाबादसह अन्य शहरांमध्ये अंड्यांच्या किंमती वाढत आहेत. सध्या १०० अंडी ५७५ रुपये दराने घाऊक बाजारात विकली जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हे दर वाढत चालले आहेत. ५७५ पासून ६०० पर्यंत दर वाढले आहेत. पुढे अंड्यांचा तुटवडा असाच कायम राहिल्यास अंडी आणखीन महागण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने वर्तवली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.