
Protect Yourself from Air Pollution : मुंबईतील हवेने प्रदूषणांचा उच्चांक गाठला आहे. प्रदूषणामुळे मुंबईतील सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. श्वसनाचा त्रास नसतानाही अनेकांना हॉस्पिटलच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
आपण श्वास घेत असलेल्या या प्रदूषित हवेमध्ये ओझोन, नायट्रोजन डायऑक्साइड, पार्टिक्युलेट मॅटर, डिझेलमधील कण इत्यादी असतात, जे आपल्या फुफ्फुसात स्थिरावतात. फुफ्फुसांच्या अस्तरावर असलेले संरक्षणात्मक अँटिऑक्सिडंट्स या सर्वांशी लढतात जोपर्यंत ते जास्त होत नाहीत, त्यानंतर प्रदूषित कण रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात आणि शरीरातील पेशी मुक्त रॅडिकल्स तयार करून जळजळ करतात.
आपल्या दैनंदिन आहारात काही पोषक तत्वांचा समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स सांगत आहोत, जे तुमच्या शरीराला या धोकादायक प्रदूषणाशी लढण्यास मदत करतील.
वायू प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे
तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
शक्य असल्यास एअर प्युरिफायर घ्या. घरातील हवेची गुणवत्ता योग्य ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
वायू प्रदूषणाचा तुमच्या त्वचेवरही (Skin) परिणाम होतो. त्यामुळे पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
घराबाहेर पडताना चांगल्या दर्जाच्या मास्कने चेहरा झाका.
नियमित अंतराने मास्क बदलत रहा.
बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला गेलात तर काही दिवस टाळा.
योगासारखे व्यायाम घरीच करण्याचा प्रयत्न करा.
घरामध्ये अशी झाडे (Plant) लावा जी प्रदूषण कमी करण्यास उपयुक्त ठरतील.
तुम्ही घरच्या घरी एलोवेरा, लिली, स्नेक प्लांट, पाइन प्लांट, मनी प्लांट, अरेका पाम आणि इंग्लिश आयव्ही लावू शकता. ही झाडे घरातील हवा स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.