
ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह त्यांच्या युतीनुसार बदल असतात. त्याचप्रमाणे नक्षत्रातही बदल होत असतो. पंचागानुसार २७ नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ मानले जाते.
पुष्य नक्षत्र जेव्हा रविवारी येते तेव्हा रवि पुष्यामृतचा शुभ संयोग तयार होतो. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग येतो. सप्टेंबर महिन्यात पुष्य नक्षत्र येत असून अनेकांना लाभ होईल.
10 सप्टेंबर 2023 रोजी रवि पुष्य नक्षत्र आहे आणि या दिवशी अजा एकादशी देखील आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची आशीर्वाद प्राप्त होते. सोने-चांदी, नवीन कार, नवीन घर, मालमत्ता इत्यादी खरेदीसाठी पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते. तसेच, 10 सप्टेंबर 2023 रोजी रवि पुष्य नक्षत्र तयार होत आहे हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे.
रवि पुष्य योग 10 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5:06 पासून सुरू होईल आणि 11 सप्टेंबर रोजी सकाळी 6:15 पर्यंत चालू राहील. 3 राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य खूप शुभ असणार आहे.
2. सिंह :
सिंह राशीच्या लोकांसाठी रवि पुष्य नक्षत्र खूप फायदेशीर ठरू शकते. या लोकांना संपत्ती मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी (Investment) खूप चांगला काळ आहे. वाहने, मालमत्ता खरेदी करू शकता.
3. तूळ:
रवि पुष्य नक्षत्र तुला राशीसाठीही भाग्यवान ठरू शकते. या लोकांना अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. आर्थिक समस्या संपतील. रखडलेली कामेही सुरू होऊन लवकरच पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती आणि कोणतीही महत्त्वाची संधी मिळू शकते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.