RBI New Rules : RBIने लागू केले बँक लॉकर वापरणाऱ्यांसाठी नवे नियम! यापुढे फक्त याच गोष्टी लॉकरमध्ये ठेवता येतील

RBI Bank Rules : बँक लॉकर ही सुविधा बँकांकडून ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते.
RBI New Rules
RBI New RulesSaam Tv

RBI New Rules For Locker : बँक लॉकर ही सुविधा बँकांकडून ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. आपल्याकडील सोने, चांदीसारख्या मौल्यवान वस्तू एक विशिष्ट भाडे देऊन बँक लॉकरमध्ये ठेवता येतात. अर्थात लॉकर बरेचदा सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी बँका त्यांच्याकडे मोठ्या रकमांच्या ठेवी ठेवायलाही भाग पाडतात.

मात्र बँक लॉकर बाबतीत लोकांच्या अधूनमधून अनेक तक्रारी येत असतात. याच तक्रारींचा विचार करून रिझर्व्ह बँक (Bank) ऑफ इंडियाने बँक लॉकर संबंधी नवे नियम (Rules) तयार केले असून हे नियम सर्वांसाठीच महत्वाचे आहेत.

RBI New Rules
RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची संधी, 291 पदांसाठी होणार भरती; इतका मिळेल पगार

आपल्यापैकी बरेच जण दागिन्यांपासून ते महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी बँक लॉकर वापरतात. जर तुम्ही देखील बँकेत लॉकर ठेवत असाल किंवा ते लवकरच करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित नवीन नियम माहित असले पाहिजेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यासाठी बँकांना सूचनाही दिल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर (Locker) भाड्याने देण्याच्या कराराचे नूतनीकरण करावे लागेल. नवीन नियमांनुसार, हा करार तयार केला जाईल, ज्यामध्ये ग्राहक (Consumer) त्यांच्या लॉकरमध्ये कोणत्या प्रकारचा माल ठेवू शकतात आणि कोणत्या प्रकारचा नाही हे स्पष्टपणे नमूद केले जाईल.

RBI New Rules
RBI Issued Notice On These Coins: RBI ने उचलले मोठे पाऊल

लॉकरमध्ये फक्त या वस्तू ठेवता येतात -

RBIच्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना बँक लॉकरमध्ये केवळ दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यासारख्या कायदेशीर वैध वस्तू ठेवता येणार आहेत. बँकेसोबतच्या करारात ग्राहकाला कोणत्या प्रकारचा माल ठेवण्याची परवानगी आहे आणि कोणती नाही हे तपशीलवार सांगितले जाईल.

एवढेच नाही तर बँकेचे लॉकर आता फक्त ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी दिले जाणार आहेत. हे हस्तांतरणीय नसतील. इंडियन बँक्स असोसिएशन एक मॉडेल करार करेल. या आधारे बँका त्यांच्या ग्राहकांशी करावयाचे करार तयार करतील.

स्टॅम्प पेपरचा खर्च बँक उचलेल -

बँकेच्या विद्यमान लॉकर ग्राहकांच्या कराराच्या नूतनीकरणासाठी स्टॅम्प पेपरचा खर्च बँक उचलेल. तर इतर ग्राहकांना बँक लॉकर घेताना कराराच्या स्टॅम्प पेपरची किंमत मोजावी लागेल.

RBI New Rules
RBI Repo Rate: गृह, वाहन कर्जाचा EMI वाढणार; RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात केली वाढ

या वस्तू ठेवण्यावर बंदी असेल -

अनेक लोक त्यांच्या बँक लॉकरमध्ये अशा वस्तू ठेवतात ज्या कायदेशीररित्या वैध नाहीत. कधीकधी ते हानिकारक देखील असते. आता आरबीआयने हेही स्पष्ट केले आहे की ग्राहक त्यांच्या लॉकरमध्ये कोणत्या वस्तू ठेवू शकत नाहीत.

आता ग्राहकांना त्यांच्या लॉकरमध्ये रोख किंवा विदेशी चलन ठेवता येणार नाही, असे केंद्रीय बँकेकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच शस्त्रे, ड्रग्ज किंवा औषधे, निषिद्ध किंवा धोकादायक किंवा विषारी वस्तू ठेवण्यास बंदी असेल.

यांपासून बँकेला दिलासा मिळणार आहे -

यासह, बँक आणि ग्राहक यांच्यात करार केला जाईल. त्यातच बँकेला अनेक जबाबदाऱ्यांतून दिलासा मिळणार आहे. उदाहरणार्थ, पासवर्ड किंवा बँकेच्या लॉकरच्या चावीचा गैरवापर किंवा बेकायदेशीर वापर झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. त्याची जबाबदारी फक्त ग्राहकाची असेल.

त्याच वेळी, ग्राहकाला त्याचे सामान लॉकरमध्ये ठेवण्याचा अधिकार असेल. बँकेला त्याचे संरक्षण करावे लागेल आणि जर बँकेने तसे केले नाही तर ग्राहकाला वेळोवेळी संबंधित नियमांनुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com