RBI Recruitment 2023: तरुणांनो लक्ष द्या! आरबीआयमध्ये नोकरीची संधी, मिळणार मोठा पगार; असा करा नोकरीसाठी अर्ज

RBI Recruitment 2023: सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
RBI Recruitment 2023
RBI Recruitment 2023Saam Tv

RBI Assistant 2023 Notification:

सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर तरुण या पदासाठी अर्ज करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भरती प्रक्रिया सुरु केल्याने तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. (Latest Marathi News)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहायक पदाच्या नोकरीसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. या तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ही भरती एकूण ४५० सहायक पदासाठी असणार आहे.

RBI Recruitment 2023
High Cholesterol : हृदयाचे आरोग्य जपा अन् वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवा! हे ५ सोपे उपाय करतील मदत

आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहायक पदासाठी ऑनलाइन पूर्व परीक्षा ही २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. तर मुख्य परीक्षा ही २ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान,परीक्षांच्या तारेखत बदल करण्यात येऊ शकतात असं बोललं जात आहे. मात्र, आरबीआयने दिलेल्या तारखेत परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे .

वयाची अट काय?

सहायक पदासाठी उमेदवार हा १ सप्टेंबर २०२३ रोजी २० वर्षांचा असावा. तसेच ही परीक्षा २८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या तरुणांना देता येणार नाही. याचबरोबर आरक्षित जागेवरून अर्ज करणाऱ्या तरुणांना वयात सूट देण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी इच्छुक आणि उमेदवारांसाठी भरती प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

RBI Recruitment 2023
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यासोबतच मिळणार प्रमोशन, सरकारची मोठी घोषणा

शैक्षणिक पात्रता काय?

आरबीआयच्या सहायक पदासाठी उमेदवार हा कोणत्याही एका शाखेचा पदवीधर असावा. तसेच त्याला पदवी परीक्षेत ५० टक्क्यांपर्यंत गुण मिळालेले पाहिजे. याचबरोबर एसी,एसटी आणि दिव्यांग वर्गासाठी पदवी परीक्षेतील गुणाची अट नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com