Smartphone Offers: 108MP चा दमदार कॅमेरा, 128GB स्टोरेज; 'हा' जबरदस्त स्मार्टफोन 30 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

New Smartphone: 108MP चा दमदार कॅमेरा, 128GB स्टोरेज; 'हा' जबरदस्त स्मार्टफोन 30 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Realme 10 Pro+ 5g Price in India
Realme 10 Pro+ 5g Price in IndiaSaam Tv

Realme 10 Pro+ 5GPrice in India:

Realme चा पॉवरफुल स्मार्टफोन Realme 10 Pro+ 5G पुन्हा एकदा सुपर प्राइसिंग डीलमध्ये उपलब्ध आहे. ही धमाकेदार डील कंपनीच्या वेबसाइटवर सध्या लाईव्ह आहे. 30 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या डीलमध्ये तुम्हाला हा फोन एमआरपीपेक्षा खूपच कमी किमतीत मिळू शकतो. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 24,999 रुपये आहे.

या डीलमध्ये तुम्ही डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर 10 टक्के कॅशबॅक देखील देत आहे. या कॅशबॅकसाठी तुम्हाला MobiKwik वॉलेटमधून पैसे द्यावे लागतील. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर हा फोन 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 67 वॉट फास्ट चार्जिंगने सुसज्ज आहे.

Realme 10 Pro+ 5g Price in India
New Smartphone: 200MP दमदार कॅमेरा, Honor 90 5G स्मार्टफोन 10 हजारांनी झाला स्वस्त; उद्यापासून सुरु होणार सेल...

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये 2412x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. Realme चा हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज पर्यायात येतो. फोनमध्ये 8 GB पर्यंत डायनॅमिक रॅम देखील देण्यात आली आहे. यामुळे गरज भासल्यास फोनची एकूण रॅम 16 GB पर्यंत वाढते.  (Latest Marathi News)

प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या फोन मध्ये तुम्हाला Mali G68 GPU सह डायमेंशन 1080 5G चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 108-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

Realme 10 Pro+ 5g Price in India
Rejected Insurance Claim Form : इन्श्युरन्स कंपनीने तुमचाही क्लेम केला रिजेक्ट, कुठे करायची तक्रार? जाणून घ्या

तसेच सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सेल इन-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे. ही 67 वॉट सुपरव्हीओओसी चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर, फोन Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर काम करतो. हा हँडसेट तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो - हायपरस्पेस, डार्क मॅटर आणि Nebula ब्लू.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com