Heart Attack Symptoms : हृदयविकाराची 'ही' 5 चिन्हे वेळीच ओळखा, अन्यथा...

Health Tips : हल्ली तरुणही हृदयविकाराला बळी पडत आहेत.
Heart Attack Symptoms
Heart Attack SymptomsSaam Tv

Heart Attack Symptoms : चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि अन्नपदार्थमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.त्यातील हृदयाशी संबंधित आजाराने अनेकांना हैराण केले आहे. हल्ली तरुणही हृदयविकाराला बळी पडत आहेत.

हृदयाशी संबंधित आजार (Disease) बीपीपासून सुरू होते त्याचे कारण चुकीच्या सवयी आणि चुकीचे खानपान असू शकते. त्यामुळे रक्तदाबाच्या संबधित समस्या निर्माण होतात आणि ब्लडप्रेशर हाय झाल्याने हृदयविकारांचा धोका वाढण्याची शक्यता खूप जास्त असते.

Heart Attack Symptoms
Eggs Harmful For Heart : हृदयाच्या आरोग्यासाठी अंडी खाणे चांगले की वाईट? जाणून घ्या

WHO नुसार जगभरात सुमारे, 1.28 अब्ज लोकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे. पण त्यातील ४६ टक्के लोकांना माहितीच नाही की त्यांना रक्तदाबाचा आजार आहे. त्यामुळे 70 कोटी लोक हाय ब्लडप्रेशर संबंधित उपचार घेत नाहीत. जरी त्यांना शरीरात काही किरकोळ लक्षणे दिसत असतील तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात परिणामी हृदयविकाराचा (Heart Attack) धोका अधिक जास्त वाढतो. जगातील जवळजवळ 75 लाख लोकांच्या मृत्यूला रक्तदाब जबाबदार आहे,असे म्हणता येईल.

अस्वस्थता, चक्कर येणे, थकवा, एनजाइना,पचनाच्या समस्या बीपी वाढल्याने उद्भवतात. सामन्यात: पुरुष याकडे आधिक लक्ष देत नाहीत त्यामुळे हे त्याच्या हृदयविकाराला कारणीभूत ठरते.चला तर मग जाणून घेऊ अशी कोणती लक्षणे आहेत जे हृदयविकराचे कारण असू शकते.

1. अस्वस्थत वाटणे

Ht न्यूजमध्ये, सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मुंबईचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ.बिपिन चंद्र भामरे यांनी सांगितले की, पुरुषांना छातीत अस्वस्थत वाटणे हे त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचे पहिले लक्षण असते. यात बऱ्याच लोकांना छातीवर दबाव आल्यासारखे आणि छातीत जळजळ होण्याचे लक्षण (Symptoms) उद्भवते.तुम्हाला जर अशा समस्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Heart Attack Symptoms
Heart Attack In Bathroom : बाथरुममध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त ! आंघोळ करताना तुम्ही देखील 'ही' चूक करताय? तर वेळीच व्हा सावध, संशोधनातून झाले सिद्ध

2. अपचन,पोटदुखी,आणि मळमळ होणे

अन्नपदार्थचे पचण व्यवस्थित न होणे,मळमळ करणे आणि पोटदुखी हे जरी तुम्हाला सामान्य लक्षण वाटत असेल. पण सतत या समस्या उद्भवत असतील तर ती हृदयविकाराची लक्षणे असू शकते.अशा वेळेस ही समस्या कायम राहिल्यास नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

3. छातीत दुखणे आणि एनजाइमा

तुम्ही चलाताना किंवा इतर कोणतेही कामे करताना तुम्हाला जेव्हा छातीत वेदना होतात. या वेदना छातीच्या मधल्या भागात सुरू होऊ लवकरच खांद्यावर आणि घशात पोहोचते. तर ते हृदयविकाराची लक्षणे असते. असे तुम्हाला आढलून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही हृदयविकारला सुरवात होण्याची लक्षणे असू शकते.

4.हात दुखणे

छातीत होणाऱ्या वेदना काही वेळातच हातांमध्येही पसरत असल्याने ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण आहे.तसेच हातामध्ये सुन्नपणा येणे आणि खांदे सुन्न पडणे हे हृदयविकाराच्या झटका येण्याचे संकेत देते. त्यासोबतच अशक्तपणा सुरू होतो. असे लक्षणे आढल्यास क्षनाचाही विलंब न लावता त्वरित डॉक्टरांना भेट देऊन उपचार सुरू करा.

Heart Attack Symptoms
Heart Care Tips : हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' 7 उपाय !

5. डोके हलके होणे आणि चक्कर येणे

डोके हलके होणे किंवा शरीरातील अशक्तपणामुळे चक्कर येणे या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. बऱ्याच वेळा या समस्या निर्माण होण्यामागचे कारण म्हणजे हृदय योग्यरित्या पंप करत नाही आणि अशा वेळेस रक्त मेंदूपर्यंत पोहचण्यास अडथळे येतात. परिणामी चक्कर येऊन शरीर हलके पडते. चक्कर येणे किंवा डोके हलके पडणे हे लक्षणे हार्ट एरिथमियाची असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com