मुंबईच्या बाजारपेठेत सोन्यामध्ये मागील 20 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक उलाढाल

मुंबईत सोन्याची 400 कोटीपर्यत उलाढाल झाल्याने मुंबईच्या सराफा व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे
मुंबईच्या बाजारपेठेत सोन्यामध्ये मागील 20 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक उलाढाल
मुंबईच्या बाजारपेठेत सोन्यामध्ये मागील 20 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक उलाढाल- Saam TV

मुंबई : मुंबईत Mumbai सोन्याची Gold 400 कोटीपर्यत उलाढाल झाल्याने मुंबईच्या सराफा व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे. काल झालेल्या दसऱ्याच्या Dussehra मुहूर्तावर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केल्याने रेकॉर्डब्रेक Record Break उलढाल मुंबईच्या सराफा बाजारांमध्ये पाहायला मिळाली. Record Break Dealing in Mumbai Gold Market

मागील वीस वर्षातील रेकॉर्डब्रेक उडाढाल झाली असून काल एका दिवसात 400 कोटीपर्यंत सोन्याची खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनामध्ये मागील वर्षी निर्बंधांमुळे सराफा बाजारात उलढाल फक्त 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत झाली होती ...मात्र यावर्षी हीच उलाढाल 70 ते 80 टक्‍क्‍यापर्यंत झाली आहे.

मुंबईच्या बाजारपेठेत सोन्यामध्ये मागील 20 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक उलाढाल
आरोग्य भरती प्रवेश परिक्षा : पुन्हा गोंधळ- चुकीच्या प्रवेश पत्रांचे वितरण

साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबई बाजारपेठेत अडीशे कोटीपर्यंत सोन्याची खरेदी होते तर महाराष्ट्रात साडे तीनशे चारशे कोटी पर्यंत ही उलाढाल होत असते. मात्र काल दसऱ्याला फक्त मुंबईच्या बाजारपेठेतच चारशे कोटी पर्यंत सोन्याची खरेदी झाली असून येत्या धनत्रयोदशीच्या दिवशी यापेक्षाही अधिक उलाढाल, सोन्याची खरेदी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा सराफा दुकान मालकांनी व्यक्त केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com