Red Ants Chutney : भारताच्या या राज्यांमध्ये आवडीने खाल्ली जाते लाल मुंग्यांची लाल चटणी

Chapda Chutney : आपण जर लाल मुंगी पहिली तर, ती मुंगी आपल्याला डंक मारेल या विचाराने आपण घाबरून जातो.
Red Ants Chutney
Red Ants Chutney Saam Tv

India's Non-Knowing Dish : आपण जर लाल मुंगी पहिली तर, ती मुंगी आपल्याला डंक मारेल या विचाराने आपण घाबरून जातो. तुम्हाला याच लाल मुंग्यांची चटनी बनवुन खायला दिली तर, भारतातील पूर्वी राज्यांमधील ओडिशा, झारखंड, छत्तीसगढ येथे अशा समुदायाचे व्यक्ती राहतात ज्यांना मुंग्यांची मसालेदार चटणी बनवुन खायला फार आवडते.

भारतामध्ये (India) विविध प्रकारचे पंचपकवान बनवले जातात. त्यातील प्रत्येक राज्य त्याच्या त्याच्या एका खास व्यंजनासाठी प्रसिद्ध आहे. आज आम्ही तुम्हाला चविष्ट मुंग्यांच्या चटणीबद्दल सांगणार आहोत.

मुंग्यांची ही लाल मसालेदार चटनी आदिवासी समाजातील व्यक्ती खातात. छतीसगढी येथील बस्तर या जंगलामधील लाल मुंग्यांच्या चटणीला चापडा या नावाने ओळखले जाते. चापडा मुंग्यांना मिठ आणि मिर्चीसोबत एकत्र करून चटनी बनवुन खाल्ली जाते. छत्तीसगढ येथील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून ही लाल चटनी बनवली जाते. झाडांवरती (Tree) असल्येल्या या लाल मुंग्यांना चापडा असे म्हटले जाते.

Red Ants Chutney
Pudina Kachori Recipe : नाश्त्यात बनवा चविष्ट अशी पुदिना कचोरी, पाहा रेसिपी

चापडा चटनी कशा पद्धतीने बनवावी -

लाल मुंग्यांची चटनी ही लाल मुंग्या आणि त्यांच्या अड्यांनपासून बनवलेली एक पेस्ट आहे. लाल मुंग्या झाडांच्या पानांवरती स्वतःच घर बनवतात. सर्वात पहिले ही पाने तोडतात आणि आगीमध्ये भाजून घेतात.

असं केल्याने मुंग्या आणि त्यांची अंडी मरून जातात. त्यानंतर या मुंगांमध्ये काही घाण विगरे असं तर, ती साफ केली जाते. त्यानंतर हळद, मिर्ची, मिठ आणि कोथंबिर टाकून चांगल्या प्रकारे पुसून घेतले जाते.

Red Ants Chutney
Pudina Chutney Recipe : पोटाची जळजळ थांबवण्यासाठी पुदिन्याची चटणी ठरेल फायदेशीर, पाहा रेसीपी

चापडा चटणीचे फायदे -

भारतामधील पूर्व राज्यांमध्ये छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंडमध्ये ही चटणी बनवली जाते. लाल मुंग्यांच्या चटणीचा उपयोग खाण्याशिवाय औषधांमध्ये देखील केला जातो.

याच्या वापराने डोळे चांगले राहतात आणि सामान्य सर्दी खोकला, गुडघ्यांचे दुखणे, आणि जबरदस्त खोकला यांसारख्या आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना देखील ही चटणी खायला देतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com