Relationship Tips : Open Relationship म्हणजे काय ? नातं थोडं अलीकडे की, पलीकडे...

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ओपन रिलेशनशीप म्हणजे काय हे माहित नाही.
Relationship Tips
Relationship TipsSaam TV

Relationship Tips : कोणतेही नाते असले की, त्यात अनेक भावना जोडल्या गेलेल्या असतात. मग ते आई-वडील असो, मित्र-मैत्रिण असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो. प्रत्येक नात्याला (Relation) एक विशिष्ट मर्यादा असते.

आपण जेव्हा नवेनवे प्रेमात पडतो विशेषत: किशोरवयीन अवस्थेतील मुलं तेव्हा त्यांना नात्याची परिभाषा माहित नसते. अशावेळी आपण बरेच वेळा भांडतो, रडतो पण आपले प्रेम देखील व्यक्त करतो. त्यानंतर आपण आपले नाते हे अजून फुलवण्याचा व जपण्याचा प्रयत्न करतो.

Relationship Tips
Relationship Tips : तुमच्या जोडीदाराला शरीर संबंधात खुश करायचे आहे ? 'या' टिप्स फॉलो करा

एका विशिष्ट काळानंतर आपण त्या नात्याचा आपल्याला कंटाळा देखील येऊ लागतो. वेळेनुसार आपली मत बदली जातात किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर बदला जातो. अशावेळी कामाच्या किंवा आपल्या वैयक्तिक कारणांमुळे आपण आपल्या आपल्या जोडीदाराला किंवा ब्रॉयफ्रेंडला दुर्लक्षित करतो. अशावेळी आपण आपल्या नात्यात ओपन रिलेशनशीपची डिमांड करतो. परंतु, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ओपन रिलेशनशीप म्हणजे काय हे माहित नाही.

ओपन रिलेशनशिपमध्ये आपल्याला आपल्या जोडीदाराशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीशी भावनिक किंवा शारीरिकरित्या जवळीक साधण्याची मोकळीक असते. आपल्या त्या नात्यावर आपला जोडीदार आक्षेप घेत नाही. असे नाते न कळण्यासारखे असते. कोणत्या प्रकारची लोक या रिलेशनमध्ये राहणे पसंत करतात हे जाणून घेऊया.

१. काही लोक स्वत:च्या कामात अधिक व्यस्त असतात त्यामुळे त्यांना कोणत्याही व्यक्तीसाठी वेळ नसतो. अशी व्यक्ती या नात्यात राहाणे अधिक पसंत करते.

Relationship Tips
Relationship Tips : 'या' स्वभावाचे पुरुष सहज जिंकतात स्त्रियांचे मन, 'हे' गुण तुमच्यात आहेत का ?

२. काही पुरुष हे आपल्या कामासाठी महिला जोडीदारावर (Partner) अवलंबून नसतात. त्यांना स्वत:ची कामे करण्यास अधिक आवडतात अशी व्यक्ती या गोष्टीकडे जास्त प्रमाणात जाण्याची शक्यता असते.

३. अशा नात्यात लैगिंक संबंध हे शारीरिक गरज आहे असे अनेक महिला व पुरुषांना वाटते. बऱ्यापैकी नात्यात फक्त गरजेपुरता गोष्टी घडत असतात.

Relationship Tips
How to Increase Sex Stamina : लैंगिक संबंधांची क्षमता वाढवायची आहे? 'या' पेयाचे सेवन करा

४. यात काही अंशी लोक असे देखील असतात त्यांना आपल्याबद्दल कोणतीही गोष्ट सांगणे गरजेची वाटत नाही किंवा समोरचा काय बोलतोय हे ऐकणे देखील गरजेचे वाटत नाही.

५. या पध्दतीच्या स्त्री व पुरुषांना अधिक प्रमाणात ओपन रिलेशनमध्ये राहाण्यास आवडते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com