सावधान! मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका...

डिजिटल डिमेन्शिया हा आजार ठरू शकतो धोकादायक
सावधान! मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका...
दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

उतारवयात होणाऱ्या मेंदूच्या असाध्य आजारांमध्ये अल्झायमर्सचा (Alzheimer's) समावेश होतो. विस्मरणाशी संबंधित या आजाराने जगात अनेक लोक ग्रासलेले आहेत. आता या आजाराचे एक कारण मोबाईलही (Mobile) बनू शकते असे लातूरचे (Latur) न्यूरो सर्जन डॉ हणमंत किणीकर यांनी म्हटले आहे. (Mobile phone side effects in Marathi)

आज जगात लहानांपासून ते मोठ्या लोकांपासून मोठ्या संख्येने अनेक व्यक्ती विविध कारणासाठी मोबाईलचा अती वापर करत आहेत. याचं मोबाईलच्या रेडिएशनमुळे (Mobile Radiation) मेंदूतील (Brain) पेशींमध्ये कॅल्शियमचा (Calcium) स्तर वाढतो व तोच अल्झायमरला कारणीभूत होतो. या बाबतीत जगात संशोधन झाले असून वैज्ञानिकांनी अल्झायमरशी निगडित अनेक संशोधनांचा आढावा घेतला आहे.

सावधान! मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका...
रस्ते नीट करा अन्यथा...; नाशिक पालिका आयुक्तांचा ठेकेदारांना अल्टिमेटम

या संशोधनात त्यांना आढळले की, सेलफोनच्या अतिवापराने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स (Electromagnetic Force) अर्थात विद्युतचुंबकीय ऊर्जा निर्माण होते व त्याचा विपरीत परिणाम मेंदूवर होतो. वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल्स (Wireless Communication Signals) विशेषतः मेंदूतील व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनेल्सला सक्रिय करतात. त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते.

मेंदूत कॅल्शियमचा स्तर एकदमच वाढल्यावर अल्झायमरची स्टेजही मेंदूत लवकर येते. याबाबतीत प्राण्यांवरील केलेल्या संशोधनात असे दिसले की, पेशींमध्ये कॅल्शियम साचल्यामुळे अल्झायमरचा अकालीच धोका संभवू शकतो.

हे देखील पाहा-

अल्झायमर हा डिमेन्शिया (Dementia) या विस्मरणाशी संबंधित आजाराचा एक सर्वसामान्यपणे आढळणारा प्रकार आहे. डॉक्टर सांगतात की, सध्या तीस ते चाळीस वर्षांचे तरुणही या आजाराच्या विळख्यात अडकलेले दिसून येतात. तासंतास मोबाईल आणि वायफाय रेडिएशनच्या सान्निध्यात राहिल्याचा हा परिणाम आहे. त्याला आता 'डिजिटल डिमेन्शिया' असेही म्हटले जात आहे. याकरिता नागरिकांनी मोबाईलचा अतीवापर (Mobile overuse) टाळण्याचे आवाहन लातूरचे न्युरो सर्जन डॉ हणमंत किणीकर यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com