Rose Water Face Mask for Men : पुरुषांनो, थंडीच्या दिवसात ग्लोइंग व मुलायम त्वचा ठेवायची आहे ? गुलाबजलचा असा करा वापर

थंडीच्या दिवसांमध्ये पुरुषांनी आपले त्वचेची काळजी कशी पद्धतीने घेतली पाहिजे. याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.
Rose Water Face Mask for Men
Rose Water Face Mask for MenSaam Tv

Rose Water Face Mask for Men : सगळ्याच महिला आपल्या त्वचेची जास्त प्रमाणात काळजी घेतात. थंडीच्या दिवसात सगळ्यांचीच त्वचा कोरडी पडलेली असते. असाच पुरुषांची त्वचा जास्त प्रमाणात कोरडी पडलेली असते. या थंडीच्या दिवसांमध्ये पुरुषांनी आपले त्वचेची काळजी कशी पद्धतीने घेतली पाहिजे. याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे.

थंडीच्या दिवसांत गुलाबजल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. गुलाबजलाला स्किन केअरसाठीचा जबरदस्त नुस्खा मानला जातो. अशातच पुरुषांची स्कीन कोरडी पडली असेल किंवा निस्तेज झाली असेल तर गुलाब जलचा वापर करू शकतात.

पुरुषांनी (Men) विंटर स्किन केअरमध्ये (Skin Care) गुलाबजल वापरल्याने पुरुषांची स्किन मुलायमच नाही तर त्वचेवरती ग्लो येतो. थंडीच्या दिवसांत पुरुषांची त्वचा भरपूर प्रमाणात कोरडी पडते आणि डल दिसू लागते. बऱ्याचदा पुरुष बाहेरच्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. परंतु हार्ड केमिकल्समुळे पुरुषांच्या जाड त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. याचा कसा वापर कराल हे जाणून घ्या

Rose Water Face Mask for Men
Skin care tips for men: तेलकट त्वचेपासून त्रस्त आहात ? 'या' घरगुती पदार्थांचा अवलंब करा

1. गुलाबजल डायरेक्ट चेहऱ्यावर लावा :

चेहऱ्यावरती गुलाबजल वापरल्याने गुलाबजल तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करते. त्याचबरोबर चेहऱ्याला टोनिंग देखील करते आणि तुमचा चेहरा मुलायम ठेवण्यास मदत करते. सर्वात आधी तुम्हाला क्लिंजरने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. त्यानंतर कॉटनच्या (Cotton) सहाय्याने टोनर चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. टोनर सुकल्यानंतर लगेचच मॉइश्चरायझर क्रीम अप्लाय करायची आहे. असं तुम्ही दिवसातून दोन वेळा केलं तर तुमच्या त्वचेला चकाकी येईल आणि त्याचबरोबर तुमची कोरडी त्वचा लगेचच मऊ पडेल.

2. गुलाबजल आणि ग्लिसरीनचा फेसमास्क :

थंडीच्या या दिवसांमध्ये कोरड्या त्वचेपासून (Skin) सुटका मिळण्यासाठी तुम्ही गुलाबजल आणि ग्लिसरीनचा मास्क वापरू शकता. यासाठी तुम्हाला तीन चमचे गुलाबजल घेऊन त्यामध्ये तीन चमचे ग्लिसरीन टाकायचं आहे. त्यानंतर एक चमचा लिंबूचा रस टाकून दोन मिनिटे चेहऱ्यावरती मसाज करायचा आहे. सतत असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो कायम राहील.

Rose Water Face Mask for Men
Rose Water Face Mask for MenCanva

3. गुलाबजल आणि मुलतानी मातीचा फेसपॅक :

गुलाब जल आणि मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यामध्ये लागेल तसं दूध ऍड करायचं आहे. त्यानंतर एक चमचा गुलाब जल घालून मिक्स करायचं आहे. त्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायच आहे आणि वीस मिनिटे चेहरा तसाच ठेवायचा आहे. वीस मिनिटे झाल्यावर ती चेहरा थंड पाण्याने (Water) स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायची आहे.

4. गुलाबजल आणि चंदनाचा फेसपॅक :

गुलाबजल आणि चंदनाचा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा चंदनाची पावडर घेऊन त्यामध्ये नारळाचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा बदामाचे तेल देखील टाकायचं आहे. शेवटी गुलाबाचं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. हा फेसपॅक वीस मिनिटे ठेवून स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचा आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com