Weight Loss Tips : थांबा ! वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खातायं ? चपाती की, ब्रेड

दक्षिण आशियाई आहारातील चपाती हे मुख्य घटक असल्याने याच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते.
Weight Loss Tips
Weight Loss TipsSaam Tv

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. काही आयुर्वेदिक उपाय करतो तर काही वेळेस औषधे खातो परंतु, वजन कमी (Weight loss) करण्यासाठी कोणते पदार्थ योग्य आहेत हे अजूनही माहित नाही.

आपल्या रोजच्या आहारात आपण चपाती किंवा नाश्त्यासाठी ब्रेड बटराचा वापर हमखास करतो. दक्षिण आशियाई आहारातील चपाती हे मुख्य घटक असल्याने याच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. कधीकधी आपल्या आवडत्या पदार्थासोबत चपाती खायची इच्छा जरी असली आणि ती संपली असेल तर आपण पर्यायी म्हणून असणाऱ्या ब्रेडकडे सहज वळतो.

ब्रेडमध्ये ब्राउन ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड आणि व्हाईट ब्रेड सारख्या विविध प्रकार आढळून येतात. परंतु, जर तुम्ही चपातीसोबत ब्रेडचा तुकडा उचलण्याचा विचार करत थांबा, योग्य काय आहे हे जाणून घेऊया.

Weight Loss Tips
Weight Loss Recipe : वेट लॉस करताय? ब्रोकोलीपासून बनवा डिलिशियस स्नॅक्स

वजन कमी करण्यासाठी चपाती की, ब्रेड यापेक्षा चांगली निवड कोणती आहे?

चपाती आणि ब्रेड हे दोन अतिशय भिन्न प्रकारचे ब्रेड आहेत आणि ते एकमेकांसाठी चांगले पर्याय नाहीत. त्याचा आपल्याला फायदा कसा होतो हे जाणून घेऊया.

१. चपाती ही गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. ज्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे पचनसंस्था देखील सुरळीत होते. सोबतच, ज्वारी, बाजरी, नाचणी इत्यादी इतर तृणधान्यांचा वापर करून बनवलेल्या चपाती देखील दक्षिण आशियाई घरांमध्ये लोकप्रिय होत आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण हेल्दी पीठ घालून चपाती खाऊ शकतात.

२. ब्रेड हा मैद्यापासून बनवला जाणारा पदार्थ आहे. ज्यामध्ये काही अंशी प्रमाणात रिफाइंड मैदा असतो ज्याचा आपल्या पचनसंस्थेवर त्रास होतो.

Weight Loss Tips
Benefits Of Lemon Tea : वजन कमी करायचे आहे ? चयापचयमध्ये सुधारणा करायची आहे ? या चहाचे सेवन करा

३. कार्बोहायड्रेट्स, विद्रव्य फायबर आणि प्रथिने यांसारख्या फायबरची वर्चस्व असलेली चपाती आपल्या शरीरासाठी (Health) आरोग्यदायी असते. हे तंतू ऊर्जा वाढवतात, निरोगी रक्ताभिसरणाला प्रोत्साहन देतात. ज्यामुळे आपल्याला अधिककाळ भूक लागत नाही.

४. ब्रेडमध्ये असणारे यीस्ट हे आपल्या पचनसंस्थेसाठी योग्य पर्याय नाही. ब्रेड लोफमधील यीस्टमुळे आपल्या शरीराला निर्जलीकरण करते. शिवाय, बाजारात सहज उपलब्ध असलेल्या सुलभ तपकिरी ब्रेडमध्ये कधीकधी तपकिरी रंग देण्यासाठी कलरिंग एजंट्स जोडले जातात.

Weight Loss Tips
Empty Stomach Exercise : सावधान ! रिकाम्या पोटी व्यायाम करताय ? फायदा होतो की, नुकसान

५. चपातीमध्ये कोणत्याप्रकारे पदार्थ मिसळवलेले नसतात किंवा त्यावर प्रक्रिया केलेली नसते. याशिवाय, ब्रेडला जोडलेल्या इमल्सीफायर्ससह भरपूर प्रक्रिया केली जाते, ज्याचे कोणतेही पौष्टिक मूल्य नसते.

६. ब्रेड हा अधिक काळ बनवून ठेवलेला असतो परंतु, चपाती ही हव्या त्यावेळेस सहज बनवला जाणारा पदार्थ आहे. ज्यामुळे आपल्या आहारासाठी ती अधिक फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com