Low Blood Pressure : मीठाचे सेवन ठरु शकते लो ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर, डॉक्टरांनी दिली माहिती

Why Blood Pressure is low : जर तुमचे ब्लड प्रेशर लो असेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Low Blood Pressure
Low Blood PressureSaam Tv

Low Blood Pressure Problem : `लो ब्लड प्रेशर ही एक सामान्य समस्या बनली आहे. लो ब्लड प्रेशर ही समस्या हाय ब्लड प्रेशरसारखा अनेक समस्यांशी निगडित आहे. जर तुमचे ब्लड प्रेशर लो असेल तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तुम्हाला चक्कर येऊ शकते, त्याचबरोबर तुम्ही बेशुद्ध पडू शकता, तुमचे चित्त थाऱ्यावर नाही राहत. डोळ्यांची चमक कमी होऊ शकते, तुम्ही चिडचिडे होऊ शकता, त्याचबरोबर तुमच्या कामामध्ये तुमचे लक्ष लागणार नाही, तुम्हाला थकवा जाणवेल.

Low Blood Pressure
Low Blood Pressure Problem : लो ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांनी करुच नये 'ही' योगासने, आरोग्याला फायद्यासोबत होईल नुकसान !

अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत ज्या तुम्हाला ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतात. एवढी कारणे असूनसुद्धा आपला समाज गंभीरतेने या आजाराकडे (Disease) पाहत नाही. प्रत्येकजण उठून डॉक्टर बनतो आणि जेवणामध्ये थोड मीठ जास्त खाणे, कॉफी (Coffee) पिणे आणि डार्क चॉकलेट खाण्यासाठी सांगतात.

आज आम्ही तुम्हाला देशाच्या टोकाशी असलेले सर गंगाराम हॉस्पिटलच्या मेडीसिन विभागचे चेरमॅन डॉ. अतुल कक्कड यांचा एक सल्ला सांगणार आहोत. डॉ. कक्कड सांगतात की लो ब्लड प्रेशर ही एक सामान्य समस्या बनली आहे. सोबतच या आजाराची लक्षणे (Symptoms) देखील सामान्य आहेत. याची कारणे देखील कॉमन आहेत. बऱ्याचदा रक्ताची कमतरता आणि हृदयासबंधीच्या कारणांमुळे आपल्याला लो ब्लड प्रेशर ही समस्या उद्भवते.

Low Blood Pressure
Low Blood Pressure : अचानक रक्तदाब कमी का होतो ? जाणून घ्या, त्याचे कारण

1. 130 आणि 90 पेक्षा कमी असेल पाहिजे ब्लड प्रेशर :

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ब्लड प्रेशर ची रंज 120/80 असली पाहिजे. मी इथे तुम्हाला थोड बरोबर करून सांगतो. आपले ब्लड प्रेशर 130/90 पेक्षा कमी असेल पाहिजे. वाढत्या वयासोबत ब्लड प्रेशरची रेंज थोडी थोडी वाढत जाते.

2. लो ब्लड प्रेशर केव्हा होतो ?

  • डॉ. कक्कड सांगतात की, ब्लड प्रेशर कमी होण्याचे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही त्वरित कारणे असतात.

  • जसं की एखाद्या व्यक्तीला डायरिया किंवा अचानक शॉक लागला असो. यामुळे जे ब्लड प्रेशर कमी होते ते लवकर होते.

  • त्याचबरोबर ते काही दिवसांनंतर नॉर्मल होऊन जाते, परंतु रक्ताची कमी आणि हृदयासंबंधीच्या समस्यांमुळे बीपी कमी झाल्यावर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे.

  • जोपर्यंत लो ब्लड प्रेशरच्या रेंजची गोष्ट आहे तर, आपण 90/60 ला लो ब्लड प्रेशरच्या कॅटेगिरीमध्ये ठेवतो.

  • लो ब्लड प्रेशर झाल्यावर तुम्हाला रुग्ण मानले जाऊ शकते आणि तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासू शकते.

  • यापेक्षा कमी ब्लडप्रेशर गेल्यावर तुमच्या शरीरातील महत्त्वाच्या अंगावर प्रभाव पडू शकतो. त्याचबरोबर बॉडीमध्ये ऑक्सिजनचा सप्लाय प्रभावीत होऊ शकतो.

Low Blood Pressure
Low Calories Food : कमी कॅलरीज असणारे पदार्थ कोणते? १०० पेक्षा कमी कॅलरीज कोणत्या पदार्थात आहे?

3. लो ब्लड प्रेशरचे प्रकार :

  • डॉक्टर कक्कड सांगतात की लो ब्लड प्रेशरला (Blood Pressure) अनेक कॅटेगिरीमध्ये वाटले आहे.

  • यामधील सर्वात पहिला टाईप म्हणजे Orthostatic Hypotension (postural Hypotension) ऑर्थोस्टेटीक हायपोटेंशनमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती अंथरुणावरुन किंवा खुर्चीवरून अचानक उठतो तेव्हा त्याचे ब्लड प्रेशर डाऊन होते.

  • यामागील कारण म्हणजे डिहायड्रेशन, दीर्घकाळ बेड रेस्ट, प्रेग्नेंसी आणि काही खास मेडिकल कंडिशन असू शकतात. अशा पद्धतीचे ब्लडप्रेशर वाढत्या वयासोबत कॉमन होऊ लागते.

4. पोस्टप्रेंडीयल हायपोटेंशन :

  • यामध्ये जेवण जेवल्यानंतर एक ते दोन तासांनी ब्लड प्रेशर डाऊन होते.

  • खासकरून हाय ब्लड प्रेशरच्या रोग्यांमध्ये आणि पार्किन्सन सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये पाहायला मिळते.

  • यामध्ये कमी प्रमाणात जेवण, कमी प्रमाणात कायब्रोहाइड्रेट डायट, जास्त प्रमाणात पाणी आणि अल्कोहोल पासून लांब राहिल्याने याला भरपूर प्रमाणात कंट्रोल केले जाऊ शकते.

5. न्यूरॅली मेडिएटेड हायपोटेंशन :

  • जेव्हा तुम्ही भरपूर वेळ उभे राहता तेव्हा सुद्धा तुमचे ब्लडप्रेशर डाऊन होते. असं अनेकदा युवांमध्ये आणि लहान मुलांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते.

  • यामागील कारण म्हणजे हृदय आणि मेंदूमधील संवादाची कमी असल्याने होते.

Low Blood Pressure
Control Blood Sugar : ब्लड शुगरला रोखण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी 'हे' काम करायलाच हवे

6. महिलांमध्ये लो ब्लड प्रेशर :

डॉक्टर कक्कड सांगतात की, महिलांना घेऊन त्यांच्या कोणत्याही स्टडीबद्दल माहिती नाही आहे. महिलांमध्ये लो ब्लड प्रेशरची समस्या कॉमन आहे. त्यांच्या हिशोबाने मेल - फिमेलमध्ये ब्लड प्रेशरची रेंज नाही बदलत.

7. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने लो बीपीची समस्या ठीक होऊ शकते :

  • डॉक्टर कक्कड असं सांगतात की, अनेक लोकांचा सल्ला देतात. परंतु याशिवाय आपल्याला आपल्या बॉडीमधील तरल पदार्थांच्या प्रमाणाकडे लक्ष दिले पाहिजे.

  • पर्याप्त प्रमाणामध्ये पाणी आणि तरल पदार्थ आपल्या बॉडी साठी अत्यंत गरजेचे आहेत. राहिली गोष्ट मिठाची.

  • तर तुम्हाला नॉर्मल प्रमाणात मीठाचे सेवन केले पाहिजे.

  • डॉक्टर कक्कड असा सल्ला देतात की, आपण आपल्या डायनिंग टेबलवर मिठाचा डब्बा ठेवला पाहिजे आणि जेवण बनवताना मिठाचा वापर केला नाही पाहिजे.

  • चहामध्ये आणि कॉफीमध्ये आपण आपल्या आपल्या हिशोबाने साखर मिसळवतो त्याचप्रमाणे प्रॅक्टिस करण्याची आणि डायनिंग टेबलवर मीठ ठेवण्याची गरज आहे.

  • परिवारामधील प्रत्येक सदस्य त्याच्या हिशोबाने आणि चवीप्रमाणे मीठ घेऊन खाईल. त्याचबरोबर आपल्या बॉडीला योग्य प्रमाणात सॉल्ट आणि सोडियमची गरज असते.

  • अशा पद्धतीने आपण आपल्या हिशोबाने मिठाचे सेवन केले पाहिजे.

  • त्याचबरोबर ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल त्यांनी मीठ कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com