
Heart Attack Symptoms : आपल्या रोजच्या आहारात पांढऱ्या पदार्थांचा समावेश नियमितपणे केला जातो. गोडाचे किंवा तेलकट पदार्थ खाण्याचा मोह कोणाला नाही आवरता येणार. भूक लागल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोक अनहेल्दी पदार्थांने दिवसाची सुरुवात करतात.
आपल्या आरोग्याला (Health) निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो तो सकस आहार. ज्याचा थेट परिणाम आपल्या हृदयाच्या (Heart) आरोग्यावर होत असतो. मसालेदार, तेलकट व गोडाच्या पदार्थांचे सेवन तुम्ही देखील करत असाल तर वेळीच थांबा. यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य खराब होऊ शकते. जाणून घेऊया मीठ व साखरेमुळे (Sugar) आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो ते.
1. साखर आपल्या हृदयासाठी हानिकारक का आहे?
जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रुट ज्यूस, कुकीज, कँडी, केक यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या पदार्थांच्या अतिसेवनाने गंभीर आजार होऊ शकतात. हॉर्वर्ड हेल्थच्या अहवालावुसार, साखर थेट जरी आपल्या हृदयावर परिणाम करत नसली तरी, ती अनेक धोकादायक घटकांना वाढवते जे हृदयासाठी हानिकारक असतात. साखरेचे रुपांतर चरबीत होते ज्यामुळे फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा येऊ शकतो. त्याबरोबर हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो.
2. वजन आणि ब्लडप्रेशरवर परिणाम
साखरेच्या अतिसेवनाने वजन वाढीचा धोका असतो कारण साखरेचे शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते. जास्त साखरेमुळे वजन आणखी वाढू शकते आणि ब्लड प्रेशर वाढवण्यास देखील कारणीभूत ठरु शकते. ज्यामुळे काही काळानंतर हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
3. मीठ हृदयाला कशाप्रकारे हानिकारक ठरते?
सोडियमचे अतिप्रमाणात सेवन फक्त हृदयासाठीच नाही तर शरीराच्या इतर अवयवांसाठी देखील हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांकडून देखील दररोज फक्त 5 ग्रॅम मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. ब्रेड, पिझ्झा, सॅण्डविच, मांस, सूप, पनीर, स्नॅक्स आणि ऑमलेट यांसारख्या पदार्थांत मिठाचे प्रमाण अधिक असते. NCBI वर प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार सोडियमच्या अतिसेवनाने रक्तात पाण्याचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक मेहेनत करावी लागते. यामुळे ब्लडप्रेशर वाढू शकते आणि हृदयरोगाचा धोका बळावू शकतो.
4. हृदयासाठी जास्त हानिकारक काय ?
साखर तुमचे वजन वाढवून लठ्ठपणाचे कारण ठरते, मधुमेहाचा धोका वाढवते, एथेरोस्क्लेरोसिसला वाढवते ही सर्व लक्षणे हृदयविकारास कारणीभूत ठरतात. तर, सोडियम ब्लडप्रेशर वाढवून हृदयरोगाचे कारण बनू शकते. जरी तुम्ही अधिक प्रमाणात साखर खात असाल किंवा जास्त मीठ खात असाल दोन्ही पदार्थ हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.