Tattoo Trend: टॅटू काढताय तर सावधान..आयुष्यभरासाठी टॅटू पडू शकतो महागात; सुईमुळे एचआयव्हीचा धोका?

टॅटू काढताय तर सावधान..आयुष्यभरासाठी टॅटू पडू शकतो महागात; सुईमुळे एचआयव्हीचा धोका?
Tattoo Trend
Tattoo TrendSaam tv

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : आजच्‍या घडीला टॅटू काढायचे फॅड आहे. परंतु, टॅटू (Tattoo) काढत असताना योग्य ती काळजी न घेतल्यास आयुष्यभरासाठी ते महागात पडू शकते. तसेच यातून एचआयव्हीचा (HIV) धोकाही उत्पन्न होऊ शकतो; असे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Tattoo Trend
Gutkha Seized In Nashik: १७ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त

आजघडीला तरुणाईमध्ये टॅटूची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक होत आहे. प्रेमात पडल्यानंतर अनेक जण सर्वात आधी टॅटू काढतात. तर काही शिवभक्त तसेच महाकाल इत्यादी टॅटू काढतात. केवळ तरुणच नव्हे तर लहान मुले आणि वयोवृद्धांमध्येही टॅटू काढण्याची क्रेझ आजघडीला मोठ्या प्रमाणात (Smbhajinagar) पाहायला मिळते. त्यामध्ये कोणाचे नाव असेल शिवाजी महाराजांचे असेल किंवा महाकालच्या टॅटूंची लोकप्रियता अधिक आहे.

Tattoo Trend
Sangli Corporation News: फाईलवर ठेवला जिवंत कोंबडा; नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

महागात पडू शकतो टॅटू

तुम्ही टॅटू काढत असाल तर टॅटू काढताना थोडीशी काळजी घेतलेली बरी; नाही तर हा टॅटू आयुष्यभरासाठी तुम्हाला महागात पडू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे. कारण टॅटू काढताना वापरलेली सुई आधीही वापरलेली असल्यास त्यातून एचआयव्हीचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. यासाठी चांगल्या दर्जाचा टॅटू पार्लरमधून, प्रशिक्षित व्यक्तीकडूनच टॅटू काढून घेतले पाहिजे. टॅटू काढताना प्रत्येकवेळी नवीन सुई वापरण्यास सांगावे. तसेच पहिल्यांदा काढताना टॅटू हा लहानच काढावा. जर त्वचेची एलर्जी असेल तर टॅटू काढू नये; असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com