Samsung आणि OnePlus ने उडवली iPhone 15 ची खिल्ली, म्हणाले...

iPhone 15 Launch: Samsung आणि OnePlus ने उडवली iPhone 15 ची खिल्ली, म्हणाले...
iPhone 15 Launch
iPhone 15 LaunchSaam Tv

iPhone 15 Launch:

Apple ने आपल्या चाहत्यांसाठी नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन iPhone 15 सीरीज लॉन्च केली आहे. या फोनमधील सर्वात मोठा बदल टाइप-सी पोर्टशी संबंधित आहे. मात्र यातच सॅमसंग आणि वनप्लसने आयफोन निर्माता अॅपलला ट्रोल केलं आहे.

वनप्लस अशी उडवली खिल्ली

OnePlus ने 23 जून 2015 ची एक जुनी पोस्ट शेअर केली, त्यात असे म्हटले आहे की, फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये USB-C सादर करणारा तो पहिला आहे. OnePlus ने 2015 मध्ये आपल्या स्मार्टफोन OnePlus2 मध्ये USB Type C चार्जिंग केबल सादर केली होती.

iPhone 15 Launch
Government Schemes: मुलींसाठी जबरदस्त 5 सरकारी योजना; शिक्षणापासून लग्नापर्यंत, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही...

सॅमसंगने देखील Apple ला ट्रोल केलं आहे. आयफोन 15 च्या यूएसबी टाइप सी चार्जिंग केबलबद्दल सॅमसंगने म्हटलं आहे की " "At least we can C one change that's magical।"  (Latest Marathi News)

Apple ने मंगळवारी आपली iPhone 15 सीरीज लॉन्च केली, ज्यात iPhone 15, iPhone plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे. भारतात iPhone 15 ची प्रारंभिक किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते आणि iPhone Pro Max साठी 1,99,900 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे.

iPhone 15 Launch
PF News: 72 तासांत तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात पीएफचे पैसे, जाणून घ्या कसे...

आयफोन 15 सीरीज लॉन्च झाल्यानंतर लगेचच आयफोन 14 ची किंमत घसरली आहे. आयफोन 14 हा 10,000 रुपयांनी सवस्त झाला आहे. या फोनची नवीन किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आली आहे.

आयफोन 14ची नवी किंमत

  • आयफोन 14 128GB 69,900Rs.

  • आयफोन 14 256GB 79,900Rs.

  • आयफोन 14 512GB 99,900Rs.

  • आयफोन 14 प्लस 128GB 79,900Rs.

  • आयफोन 14 प्लस 256GB 89,900Rs.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com