6000 mAh दमदार बॅटरीचा Samsung Galaxy M32 झाला स्वस्त; जाणून घ्या नवी किंमत

गॅलेक्सी एम-सीरीजचा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाला होता.
Samsung Galaxy M32 price, Review, Features, Tech News Updates
Samsung Galaxy M32 price, Review, Features, Tech News UpdatesSaam Tv

भारतात Samsung Galaxy M32 हा स्मार्टफोन दोन हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. गॅलेक्सी (Mobile) एम-सीरीजचा हा स्मार्टफोन गेल्या वर्षी जूनमध्ये लाँच झाला होता. त्यात ६००० mAh बॅटरी आहे.(Samsung galaxy M32 specifications)

Samsung Galaxy M32 या मोबाइल फोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शनमध्ये मिळतो. तसंच दोन जीबी रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये ग्राहकांना तो खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ या फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले आहे.

Samsung Galaxy M32 price, Review, Features, Tech News Updates
Satara: अनाथ प्राण्यांची तारणहार Rescue Mom सायली त्रिंबके काळाच्या पडद्याआड

Samsung Galaxy M32 ची किंमत (Galaxy M32 price)

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन ब्रँडने Samsung Galaxy M32 हा स्मार्टफोन (Mobile) गेल्या वर्षी जूनमध्ये १४, ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. त्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा समावेश आहे.

टॉप एंड ६ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १६९९९ रुपये आहे. बेस मॉडेल सध्याच्या घडीला कंपनीच्या वेबसाइटवर आणि अॅमेझॉन इंडियावर १२, ९९९ रुपयांत लिस्टेट आहे. तर टॉप एंड ऑप्शनचा स्मार्टफोन १४, ९९९ रुपयांना आहे. हँडसेट ब्लॅक आणि लाइट ब्ल्यू कलरमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M32 price, Review, Features, Tech News Updates
कोरोनाची चौथी लाट आली? देशातील 24 तासांतील आकडेवारी उरात धडकी भरवणारी

Samsung Galaxy M32 ची वैशिष्ट्ये (Galaxy M32 Features)

ड्यएल सिम (नॅनो) सॅमसंग गॅलेक्सी एम ३२ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्यात 90Hz रिफ्रेश रेट आहे. तर, डिस्प्ले कमाल 800 nits ब्राइटनेस सपोर्ट करतो. त्यात ऑक्टा-कोर MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.

याशिवाय ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनचा स्टोरेज १२८ जीबी आहे. त्यात मायक्रो एसडी कार्डद्वारे आणखी वाढवता येऊ शकतो. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये(Mobile) ४ जी एलटीई, वायफाय, ब्ल्यूटुथ, जीपीएस, यूएसबी, टाइप सी आणि ३.५ mm हेडफोन जॅक आदींचा समावेश आहे. फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. Samsung Galaxy M32 ची बॅटरी 6000 mAh क्षमतेची आहे. ती 25w फास्ट चार्जिंग सपोर्ट करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com