Air Force Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! भारतीय हवाई दलात अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् कसा कराल अर्ज?

Air Force Agniveer Sports Quota Recruitment 2023 : भारतीय हवाई दलाकडून क्रीडा कोट्याअंतर्गत भरती केली जात आहे. ही भरती अग्निवीर अंतर्गत केली जाणार आहे.
Air Force Recruitment 2023
Air Force Recruitment 2023Saam Tv

भारतीय हवाई दल भरती (Air Force Recruitment):

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवाई दलाकडून क्रीडा कोट्याअंतर्गत भरती केली जात आहे. ही भरती अग्निवीर अंतर्गत केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येईल. अविवाहित (Unmarried) पुरुष उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

भरतीसाठी अर्ज 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाले आहेत आणि 20 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. यानंतर 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2023 या कालावधीत क्रीडा चाचणी होणार आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करावा हे लक्षात ठेवा. 20 सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल त्याच सायंकाळी 5 नंतर कोणी अर्ज करू शकणार नाही. आणि केल्यास कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Air Force Recruitment 2023
NABARD Recruitment 2023 : तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डमध्ये 150 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा फॉर्म (Form) स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.ac.in वर दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज करावा. तसेच, त्यांनी दिलेल्या फॉर्मची अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण चुकीचा भरलेला फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

अर्ज फी -

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही फी भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा -

भारतीय हवाई दल अग्निवीर स्पोर्ट्स कोटा भर्ती 2023 साठी उमेदवारांचा जन्म 20 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान झालेला असावा. तर या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता -

भारतीय हवाई दल अग्निवीर स्पोर्ट्स (Sports) कोटा भर्ती 2023 साठी, उमेदवारांनी 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवारांकडे संबंधित खेळाचे प्रमाणपत्रही असावे. अधिसूचनेत अधिक तपशील तपासले जाऊ शकतात.

निवड प्रक्रिया -

  • उमेदवारांची निवड फिटनेस चाचणी

  • क्रीडा चाचणी

  • वैद्यकीय चाचणीनंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

अशा प्रकारे भरतीसाठी अर्ज करा

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.

  • यानंतर Recruitment लिंकवर क्लिक करा.

  • वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.

  • यानंतर, लॉग इन करा, फॉर्म भरा आणि सबमिट करा.

  • आता फी जमा करा आणि कागदपत्रे अपलोड करा.

  • Final Submit वर क्लिक करा.

  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Air Force Recruitment 2023
Beed Zp Recruitment: बीड जिल्हा परिषदेत ५६८ पदासाठी २१ हजार १३१ अर्ज

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com