Saturday Tips: शनिवारी या गोष्टी दृष्टीस पडणे असते शुभ, समजून जा 'अच्छे दिन' येणार

शनिदेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि कुंडलीत शनि ग्रह बलवान होतो
Saturday Tips
Saturday TipsSaam Tv

मुंबई: हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि कुंडलीत शनि ग्रह बलवान होतो. तसेच, शनिची वक्र दृष्टी तुमच्यावर पडत नाही आणि शनिपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळते (Saturday Tips If You See These Things On Saturday It Means Your Going To Be Lucky).

चांगले आणि सुखी जीवन जगण्यासाठी शनिदेवाची (Shanidev) कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, शनिदेव जर तुमच्यावर नाराजा झाले तर ते तुमचं आयुष्य उध्वस्तही करु शकतात. आज आपण अशाच काही संकेतांबाबत जाणून घेणार आहोत जे शिनवारी (Saturday) दृष्टीस पडल्यास शनिदेवाची कृपा तुमच्यावर होणार आहे.

Saturday Tips
Vastu Tips: तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली हवीये, फक्त 'हे' एक काम करा

शनिची कृपा मिळण्याचे संकेत

शनिवारी काही खास गोष्टी दिसल्या तर समजा तुमच्यावर शनिदेवाची कृपा होणार आहे. या गोष्टी शनिशी संबंधित आहेत आणि शनिवारी त्यांचे दर्शन करणे खूप शुभ मानले जाते.

💠काळा कुत्रा दिसणे - शनिवारी सकाळी रस्त्यावर काळा कुत्रा दिसणे शुभ मानले जाते. काळ्या कुत्र्याला शनिदेवाचे वाहन मानले जाते. अशावेळी काळ्या कुत्र्याला दुधाची भाकरी, मोहरीच्या तेलाचा पराठा, भाकरी वगैरे खाऊ घाला. यामुळे शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतात.

💠सफाई कर्मचारी दिसणे - शनिवारी जर तुम्हाला सफाई कामगार रस्ता स्वतच्छ करताना दिसले, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. ज्या कामासाठी तुम्ही घरुन निघाले आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शक्य असल्यास सफाई कामगाराला काही दान द्या.

💠भिकारी दिसणे - गरजू आणि असहाय्य लोकांना मदत करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात. जर तुम्हाला शनिवारी असा गरजू दिसला तर त्याला नक्कीच काहीतरी दान करा, असे केल्याने तुमच्यावर शनिची कृपा होईल. लक्षात ठेवा चुकूनही कोणत्याही भिकाऱ्याचा किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करु नका.

(टीप - वर दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि मान्यतांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.)

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com