SBI FD : एसबीआयच्या विशेष एफडीत ज्येष्ठांना मिळणार मोठी सूट; एका योजनेत तर मिळतील दुप्पट पैसे

SBI FD News : एसबीआय बँक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करते.
SBI FD
SBI FDSaam Tv

SBI Fixed Deposit

पैसे गुंतवण्यासाठी सुरक्षित मार्ग म्हणजे एफडी. आजकाल लोक शेअर मार्केट, स्टॉक मार्केट अशा अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. परंतु जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा लोक एफडीला प्रधान्य देतात. अनेक बँका एफडीसाठी अनेक चांगले पर्याय देतात.

देशातील सर्वात मोठी एसबीआय बँक ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतची एफडी ऑफर करते. एसबीआय ग्राहकांना नेहमी ३ टक्के तर ६.५ टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ३.५ ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. एसबीआयची एफडी ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

SBI FD
Dahi Handi 2023: मुंबईकरानों, दहीहंडीच्या या ५ मानाच्या पथकांबद्दल माहितेय का?

जर ग्राहकानं नियमित एसबीआयच्या १० वर्षाच्या मॅच्युरिटी स्कीममध्ये एकरकमी ५ लाख रुपये जमा केले तर एसबीआयच्या आकडेवारीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.५ टक्के व्याजदर मिळेल. म्हणजेच ग्राहकांना एकूण १०,५१,१७५ रुपये मिळतील. व्याजातून ५ लाख ५१ हजार १७५ रुपये निश्चित मिळतील.

बँकाच्या एफडी खूप सुरक्षित मानल्या जातात. ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर कलम ८० सीमध्ये टॅक्स सूट फायदा मिळतो. एफडीवरील व्याज करपात्र आहे.

SBI FD
Honor 90 5G: भारतात लवकरच लॉन्च होणार Honor 90 5G! दमदार कॅमेरासह किमत अगदी खिशाला परवडणारी

इनकम टॅक्सनुसार, एफडी स्कीमवर टॅक्स डिडक्शन ऑट सोर्स लागू आहे. म्हणजेच एफडीच्या मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम तुमचे उत्पन्न असेल. त्यावर तुम्हाला स्लॅब रेटनुसार कर भरावा लागेल. आयटी नियमांनुसार, ग्राहक कर सूट मिळवण्यासाठी फॉर्म १५/ १५ एच सादर करु शकतात.

Disclaimer : ही माहिती फक्त रेफरन्ससाठी वापरा. गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com