SBI Banking Facility : एसबीआय देतेय ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ही' खास सुविधा; आता लांबलचक रांगेची चिंता नाहीशी !

जग कितीही डिजीटलायझेशन होत असल तरी काही गोष्टींसाठी बँकेत जावेच लागते.
SBI Banking Facility
SBI Banking FacilitySaam Tv

SBI Banking Facility : हल्ली सगळ्याच बँकेत लांबलचक रांगा आपल्याला पाहायला मिळतात. जग कितीही डिजीटलायझेशन होत असल तरी काही गोष्टींसाठी बँकेत जावेच लागते. बऱ्याचदा असे होते की, वयोवृद्धांना बँकेच्या लांबलचक रांगेत उभे राहूनही त्यांचे काम लवकर होत नाही मग पुन्हा प्रश्न उभा राहातो तो सरकारी नियमांचा.

स्टेट बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा (Scheme) देते आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागणार नाही. व्हॉट्सअॅपवर फक्त एक मेसेज पाठवून या सुविधेचा लाभ घेता येईल. देशातील सर्वात मोठ्या कर्जदार बँकेने ही माहिती आपल्या ट्विटर अंकाउटवरुन दिली आहे.

या सुविधेचा लाभ कसा घ्यावा ?

  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 9022690226 वर Hi लिहून मेसेज पाठवावा लागेल.

  • SBI बँकेच्या (Bank) WhatsApp सुविधेअंतर्गत 'हाय' मेसेज केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील.

  • ज्यामध्ये शिल्लक माहिती, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिप असेल.

  • यानंतर, पेन्शन स्लिपवर क्लिक करा आणि तुम्हाला ज्या महिन्याची पेन्शन स्लिप हवी आहे ती निवडावी लागेल.

  • थोडा वेळ थांबल्यानंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटांत पेन्शन स्लिप दिली जाईल.

SBI Banking Facility
Bank Holiday : नोव्हेंबरमध्ये बँका राहणार १० दिवस बंद; वाचा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

SBI WhatsApp बँकिंग सेवा

  1. बँकेने आपल्या ग्राहकांना अधिक दिलासा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर बँकिंग सेवा सुरू केली आहे.

  2. या सुविधेअंतर्गत, SBI ग्राहक शिल्लक माहितीपासून ते मिनी स्टेटमेंटपर्यंतची माहिती मिळवू शकतो.

  3. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर नोंदणी करावी लागेल.यासाठी SBI च्या खातेदारांना 7208933148 या क्रमांकावर 'WARG' मजकूरासह स्पेस देऊन खाते क्रमांक टाकावा लागेल आणि एसएमएस पाठवावा लागेल.

  4. तसेच, तुम्हाला खात्यातून नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे एसएमएस पाठवावा लागेल.

नोंदणी केल्यानंतर सुविधांचा लाभ कसा घ्यावा

नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एसबीआय नंबर 90226 90226 वरून व्हॉट्सअॅप नंबरवर एक संदेश मिळेल. आता तुम्ही या नंबरवर 'हाय' मेसेज पाठवू शकता किंवा SBI कडून आलेल्या मेसेजला उत्तर देऊ शकता. याशिवाय, तुम्ही SBI च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करू शकता.

बँकेत जाऊन पेन्शन स्लिपही घेता येते

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक त्यांच्या जवळच्या शाखेत जाऊन SBI कडून पेन्शन स्लिप घेऊ शकतात, परंतु यासाठी तुमचे बँकेत खाते असणे आणि तुमच्याकडे मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि पेन्शनची रक्कम दरमहा येत राहिल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com