आल्याच्या पाण्याचे फायदे पाहून थक्क व्हाल...

आयुर्वेदातही आल्याचे विशेष महत्व सांगितले आहे. आले हे अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांचे एक पॉवरहाऊस आहे.
आल्याच्या पाण्याचे फायदे पाहून थक्क व्हाल...
आल्याच्या पाण्याचे फायदे पाहून थक्क व्हाल...saam tv news

स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे आले हे किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहितच आहे. अगदी चहापासून ते जेवणापर्यंत सगळीकडेच आल्याचा उपयोग होतो. आयुर्वेदातही आल्याचे विशेष महत्व सांगितले आहे. आले हे अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्मांचे एक पॉवरहाऊस आहे जे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. आज आपण आल्याचे पाणी कसे तयार करायचे आणि त्याचे काय फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. (see the benefits of ginger water)

हे देखील पहा -

आल्याचे पाणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री

१) गरजेनुसार ताजे आले

२) ३ कप पाणी

३) एक चमचा मध

आले पाणी बनवण्याची प्रक्रिया

ताजे आले किसून घ्या आणि एका भांड्यात ठेवा. नंतर 3 कप पाणी उकळा. हे पाणी उकळल्यावर त्यात आले टाका आणि गॅस बंद करुन 5 मिनिटे पाणी असेच राहू द्या. त्यानंतर एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. आणि अशाप्रकारे आले पाणी पिण्यासाठी तयार आहे. रोज एक ग्लास हे पाणी पिल्यास चांगला फायदा होतो.

आले पाणी पिण्याचे फायदे -

वजन कमी करण्यासाठी -

नियमितपणे आले पाणी घेतले तर ते पोषकद्रव्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते. त्यामुळे भूकही कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

सर्दी-खोकला, घसा खवखवणे बंद करते -

आलं हे सर्दी-खोकला आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्येवरही फायदेशीर ठरते. खोकला थांबत नसेल तर कच्चे आले चावूम खावे आणि त्यावर एक चमचा मध घ्यावा याने नक्की आराम मिळतो.

आल्याच्या पाण्याचे फायदे पाहून थक्क व्हाल...
Ranu Mandal Biopic: राणू मंडल यांच्यावर बायोपिक येणार, इशिका डे साकारणार भुमिका

त्वचेसाठीही फायदेशीर -

आले हे अँटिऑक्सिडेंट जिंजरॉल आहे. जे मुक्त रॅडिकल्सशी लढू शकते. हे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर ते चमकदार होण्यास मदत करते. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म सर्व प्रकारच्या संसर्गाशी लढू शकतात आणि आपली त्वचा निरोगी करू शकतात.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com