Shani Sadesati: तुमच्याही राशीत शनी आहे? 'या' उपायांनी रखडलेली कामे होतील पूर्ण

Shani Sadesati: शनीच्या साडेसातीमध्ये व्यक्तीचे आयुष्य कधीही उध्वस्त होत नाही.
Shani Sadesati
Shani SadesatiSaam TV

Shani Dev:

शनी देवता प्रत्येकाला समान न्याय देतो असं म्हटलं जातं. अनेक व्यक्तींच्या आयुष्यात शनीची साडेसाती लागते. या काळात व्यक्तींना आर्थिक, व्यावहारिक अशा काही अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा आरोग्याच्याही गंभीर समस्या उद्भवतात. याचा सामना करताना व्यक्तीच्या आयुष्यात नैराश्य येते. (Latest Marathi News)

शनीची साडेसाती लागल्यावर अनेक सोप्या गोष्टी कठीण होतात. या काळात शांततेने प्रतेक आव्हानाचा सामना करावा लागतो. शनीच्या साडेसातीमध्ये व्यक्तीचे आयुष्य कधीही उध्वस्त होत नाही. फक्त या काळात मेहनत आणि चिकाटीने काम करावे लागते. तसेच शनी देवता प्रसन्न राहण्यासाठी काही उपाय करावे लागतात. तेच उपाय आज जाणून घेऊ.

Shani Sadesati
High Cholesterol Food : वाढते कोलेस्ट्रॉल झटकन होईल कमी; या फळांचा आहारात समावेश करा, आठवड्याभरात मिळेल रिजल्ट

पाहिला उपाय

शनीदेवता प्रसन्न नसेल आणि त्याचा तुमच्या आयुष्यात जास्त त्रास होत असेल तर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करण्यास सुरुवात करा. याने आलेल्या अडचणी काही प्रमाणात दूर होतील.

दुसरा उपाय

सात मुखी रुद्राक्ष देखील तुम्ही धारण करू शकता. शनीपासून वाचाण्याठी याचा फायदा होतो. सती मुखी रुद्राक्ष सोमवारी गांगजलमध्ये धुवून गळ्यात धारण करा. तुम्ही शनिवारी देखील रुद्राक्ष धुवून धारण करू शकता.

Shani Sadesati
Shani Dosh Upay : कुंडलीतील शनिदोषामुळे कामात अडचणी येताय? मग शनिवारी करा हा उपाय, अनेक अडथळे होतील दूर!

तिसरा उपाय

वरील उपाय तुम्हाला योग्य वाटत नसतील तर तुम्ही तिसरा उपाय करू शकता. यामध्ये मुक्या जनावरांना खाद्य द्यावे लागेल. काळ्या गाई किंवा काळे श्वान यांना रोज भाकरी खाऊ घालावी. त्याने देखील शनीच्या त्रासापासून वाचता येते.

चौथा उपाय

आपल्या आयुष्यात कायम खरे बोला. शनी खरे बोलणाऱ्या व्यक्तींना कायम साथ देतो. तसेच शनिवारी तीळ आणि मुगाची डाळ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

पाचवा उपाय

शनिवारी काळे कपडे परिधान करा. तसेच शनी मात्रांचा जप करा. हा जप केल्याने तुम्हाला बराच फायदा होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com