शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ८५० अंकांनी कोसळला

जागतिक शेअर मार्केटमधील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला आहे.
Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest Updates
Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest UpdatesSaam Tv

वृत्तसंस्था: आज भारतीय शेअर मार्केटमध्ये (Share Market) रंग वेगळा होता. जागतिक शेअर मार्केटमधील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर (Share Market) दिसून आला आहे. सेन्सेक्स (Sensex) ८५० अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टी देखील १५० हून जास्त अंकाची घसरण झाली आहे. (Share Market News updates Today)

हे देखील पाहा-

अमेरिकन आणि आशियाई शेअर मार्केटची घसरण झाल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी अमेरिकन शेअर मार्केट (Share Market) मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर, आशियाई शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू आहे. हँगसेंग निर्देशांक ४ टक्क्यांनी कोसळला आहे.

Share Market News Today, Sensex Today, Sensex Latest Updates
कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार; जुना पुणे नाका येथील घटना

आज शेअर मार्केटचे व्यवहार सुरू झाले, तेव्हा सेन्सेक्स ७७३.९४ अंकानी म्हणजे जवळपास १.३९ टक्क्यांची घसरला आहे. सेन्सेक्स आज ५४,९२८.२९ अंकावर सुरू झाला. तर सेन्सेक्स ५५ हजार अंकाच्या खाली घसरला आहे. निफ्टीत ५० मधील सर्व ५० शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याने शेअर मार्केटचा दर घसरला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com