अदानी ग्रुपच्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना दिले 1 लाखाचे 1 कोटी
Gautam AdaniSaam TV

अदानी ग्रुपच्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना दिले 1 लाखाचे 1 कोटी

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani group) गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत आहेत.

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani group) गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा देत आहेत. आता आपण ज्या कंपनीच्या शेअरबद्दल बोलत आहोत त्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 7 वर्षात एवढा परतावा दिला आहे त्यामुळे गुंतवणूकदार करोडपती बनवले आहेत. हा शेअर म्हणजे अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission Ltd). हा शेअर गेल्या 7 वर्षांत 26.60 रुपयांवरून 2,779 रुपयांपर्यंत गेला आहे. या कालावधीत, या स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 10, 347 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किंमतीने घडवला इतिहास

अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स, सात वर्षांपूर्वी NSE वर 18 सप्टेंबर 2015 रोजी 26.60 रुपयांवर होते, ते आता 2,779 रुपये (29 एप्रिल 2022) पर्यंत वाढले आहेत. या कालावधीत त्यांनी 10347.37 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, पाच वर्षांत हा स्टॉक रु. 72.55 (5 मे 2017 रोजी NSE) वरून 2,779 रु. पर्यंत वाढला आहे. या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 3,730.46 टक्के परतावा दिलेला आहे. एका वर्षात शेअर रु. 1,066 वरून रु. 2,779 वर पोहोचला. या कालावधीत त्यांनी 160.69 टक्के परतावा दिला आहे. अदानी ट्रान्समिशनच्या स्टॉकने या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 60.53 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात स्टॉक 13.27 टक्के वाढला आहे.

गुंतवणूकदारांना करोडोंचा फायदा

अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किमतीमुळे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये सात वर्षांपूर्वी रु. 26.60 या दराने 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक आत्तापर्यंत ठेवली असेल, तर ती आजच्या तारखेनुसार 1 कोटी रुपयांपर्यंत वाढली असती. त्याच वेळी, गेल्या पाच वर्षांत, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 72.55 रुपये प्रति शेअर दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 38.30 लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे, 1 लाख रुपयांची गुंतवणूक गेल्या एका वर्षात 2.60 लाख रुपयांपर्यंत वाढली असती.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.