Shopping Sale : अॅमेझॉन फ्लिपकार्टसह 'या' साइटवर सुद्धा सुरु होतोय सेल, कमी दरात मिळतील असंख्य वस्तू; लगेच पहा

फेस्टिवल शॉपिंग करायची आहे तर या साइटवरुन करा.
Shopping Sale
Shopping SaleSaam Tv

Shopping Sale : सणासुदीच्या काळात आपण प्रत्येक जण काही ना काही खरेदी करत असतो. हल्ली बाहेर शॉपिंग करण्यापेक्षा आपल्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनवरुन अवघ्या काही वेळात आपल्याला हवी तशी शॉपिंग करता येते. ना कोणाची कटकट ना रिटर्न करण्याचे टेंन्शन

अनेक शॉपिंग साइट्सवर सणासुदीच्या काळात सेल सुरु असतात. कमी दरात आपल्याला हवी ती गोष्ट सहज मिळू शकते. पण सगळ्याच साइट्सवर सुरु असणाऱ्या या सेलमुळे (Sale) आपला गोंधळ उडतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला अशी एक साइट्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची शॉपिंग लगेच होईल.

Shopping Sale
Fashion tips : ट्रेंडीग पण खिशाला परवडतील अशा फॅशन टिप्स

अॅमेझॉन फ्लिपकार्टसह मिंत्रावर सुध्दा २३ सप्टेंबरपासून सेल सुरु होणार आहे. फेस्टिवल सिजनसाठी यामध्ये अनेक ऑफर आपल्याला मिळतील. यात ५० ते ९० टक्क्यांची सूट देखील आपल्याला मिळेल.

लहान मुलांपासून वयोवृध्दांपर्यंत प्रत्येकाला हवा असाणारे ब्रँड आपल्याला यात मिळू शकतो. यात अनेक डिल्स असून BFF सेल आपल्याला मिळणार आहे. या शॉपिंग (Shopping) साइट्सवर आपल्या बजेटमध्ये आपण खरेदी करु शकतो.

Shopping Sale
जाणून घ्या, मुंबईच्या या ठिकाणाला चोर बाजार का म्हणतात

यात दुर्गा पूजा, नवरात्री व इतर अनेक गोष्टींसाठी धमका ऑफर सुरु होणार आहे. महिलांपासून पुरुषांपर्यंत सगळ्या लुक, ज्वेलरी, शूज व इतर अनेक गोष्टींवर सुट मिळेल. यात काही असे ब्रँडदेखील आहे जे आपण विशलिस्टमध्ये अॅड करु शकतो. काही असे ब्रँड आहेत जे फक्त मिंत्राचे असून त्यावर देखील आपल्याला ऑफर मिळणार आहे.

मेड इन इंडिया ते हॉटेस ट्रेंड विथ फेस्टिव फेलर अशा अनेक ऑफर आपल्याला मिळतील. त्यासाठी आजच तुमच्या विशलिस्ट व कार्टमध्ये सण-समारंभासाठी तुम्हाला हवे असणाऱ्या फॅशन लूक फॉलो करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com