Workout In Summer : उन्हाळ्यात जीमला जावे की, नाही ? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

Exercise In Summer Season : व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे.
Workout In Summer
Workout In SummerSaam Tv

Gym Workout : बदलत्या जीवनशैलीनुसार निरोगी राहण्यासाठी आपण आहार व खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असतो. यामध्ये व्यायाम करणे देखील तितकेच गरजेचे आहे. निरोगी शरीरासाठी रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. यामुळेच अनेक लोक फिट राहण्यासाठी रोज जिम करतात.

काही लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये तासनतास घालवतात. पण उन्हाळ्यात कसरत करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. हळूहळू तापमान वाढत आहे. अशा परिस्थितीत, व्यायामाची योग्य वेळ (Time) आणि त्यासंदर्भात घ्यावयाची खबरदारी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

Workout In Summer
Gym Side Effects : जीम केल्यानंतर शरीरात ही लक्षणे दिसताय? ठरु शकते जीवघेणे

डॉक्टर (Doctor) म्हणतात, हिवाळा हा काळ व्यायामासाठी उत्तम असतो, पण आता लोक आरोग्याबाबत इतके जागरूक झाले आहेत की उन्हाळ्यातही तासनतास व्यायाम करतात. या हंगामात तापमान खूप जास्त असते. म्हणूनच अधिक व्यायामासाठी हा योग्य हंगाम नाही. जर एखाद्याला पहिल्यांदा जिम सुरू करायची असेल तर हिवाळ्याच्या हंगामापासून सुरुवात करणे चांगले.

1. उन्हाळ्यात व्यायाम केव्हा करावा ?

उन्हाळा असो की हिवाळा, व्यायाम करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ. उष्णता जास्त असेल तर व्यायाम करण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ करावी. यानंतर व्यायाम किंवा कसरत करावी. वर्कआउट केल्यानंतर शरीर थोडे थंड झाल्यावर नाश्ता करून पुन्हा आंघोळ करा. यामुळे शरीराला आराम वाटेल.

Workout In Summer
Body Stretching After Workout : एक्सरसाइज नंतर अशाप्रकारे करा बॉडी स्ट्रेच, अनेक दुखणी होतील गायब !

उन्हाळ्यात वातानुकूलित ठिकाणी व्यायाम करत असाल तर उत्तम. व्यायामामुळे जास्त घाम येतो, अशा स्थितीत भरपूर पाणी प्यावे. चालणे, जॉगिंग, धावणे यासारखे कार्डिओ व्यायाम उन्हाळ्यात जास्त करावेत. ज्यांना हृदयाची समस्या, दमा, फुफ्फुसाची समस्या अशा कोणत्याही समस्या असतील त्यांनी जड व्यायाम टाळावा. त्याऐवजी, आपण चालणे किंवा जॉगिंग करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com