
Should You Tell Your Life Partner About An Old Affair : लग्न म्हणजे जिथे दोन लोक एकत्र येऊन उज्ज्वल भविष्याच्या आशेने एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतात. म्हणून आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय घेताना या नात्याची सुरुवात सत्यापासून व्हायला हवी. त्यामुळे अशा वेळेस ज्या लोकांचे पूर्वी प्रेमसंबंध होते त्याच्यासाठी विवाह हा कठीण प्रसंग असतो.
होणाऱ्या जोडीदाराला (Partner) पूर्वीचा नात्याबद्दल सांगायचे की नाही ते ठरवू शकत नाहीत. त्यांच्या मनात भिती असते भूतकाळामुळे भविष्य खराब होईल. जर तुम्ही देखील अशा परिस्थितीत अडकले असाल तर हा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनातील शंका नक्की दूर होईल.
1. लाईफ पार्टनरला पास्टबद्दल सांगावे का?
तुमच्या जोडीदारासोबत आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पूर्वीच्या नात्याबद्दल सांगावे. असे रिलेशनशिप (Relationship) एक्सपर्टचे मत आहे. कारण असे वागणे तुमच्यातील प्रामाणिकता आणि पारदर्शकता दर्शवते. या गोष्टी लग्नासारख्या (Marriage) नात्यासाठी खूप गरजेच्या असतात.
2. पूर्वीच्या नात्याबद्दल सांगताना हे लक्षात ठेवा
कोणाकडेही तुमच्या पास्ट लाईफबद्दल सांगताना काळजीपूर्वक सांगावे. जर तुमचा भूतकाळ अशा घटनांनी भरलेला असेल की ज्याला समजणे प्रत्येकाच्या सामर्थ्य नसेल. त्यामुळे अशा वेळेस भूतकाळ सोमरच्याला न सांगता स्वतःकडेच ठेवणे चांगले.
3. भूतकाळ सांगायचे ठरवण्याआधी जोडीदाराला समजून घ्या
हल्लीच्या काळातील लोक खूप आधुनिक आणि मोकळया विचारांचे झाले आहेत. परंतु जेव्हा इतरांना समजून घेण्याची वेळ येते तेव्हा लोक अगोदर जजमेंटल होतात. त्यामुळे जर तुम्ही मुलगी असाल आणि लग्नपूर्वी तुम्ही प्रेम (Love) संबंधात असाल, कदाचित तुमचा भूतकाळ जाणून घेतल्यामुळे तुमचा जोडीदर तुम्हाला चारित्रहीन बोलू शकतो. त्यामुळे भूतकाळाविषयी सांगण्याआधी जोडीदाराला समजून घेणे फार गरजेचे आहे.
4. भूतकाळाविषयी पहिल्या भेटीत कधीही बोलू नका
आयुष्यात पुढे जाण्यापूर्वी अनेक वेळा आपण आपल्या उनिवा समोरच्या व्यक्तीसमोर मांडतो. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला एकत्र राहायचे आहे की नाही हे ठरवता येते. पहिली भेट नेहमी एकमेकांना जाणून घेण्यासाठी असते. एकमेकांच्या एक्स प्रियकरांबद्दल बोलायची नाही. त्यामुळे पहिल्या भेटीत एकमेकांना जाणून घेणे गरजेचे असते.
5. लव लाईफविषयी चर्चा करताना सावधगिरी बाळगा
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जोडीदार पास्ट लव रिलेशनशिपला एक्सेप्ट करू शकतो. तर त्यांना पूर्वीच्या लव रिलेशनशिपबद्दल ओव्हर व्ह्यू द्या. कोणत्याही गोष्टीबद्दल सविस्तरपणे बोलू नका कारण यामुळे तुमचा पार्टनर अस्वस्थ होऊ शकतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.