
दरवर्षी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील साजरी करण्यात येते. पोळा हा सण श्रावण महिन्यातला शेवटचा सण ओळखला जातो. यानंतर भाद्रपद मास सुरु होऊन चतुर्थील गणपतीचे आगमन होते.
शेतकऱ्यांचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल. त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण शेतकरी साजरा करतो. शेतातील धान्य पिकवण्यासाठी बळीराजाला मोठा हातभार लागतो. त्यासाठी बैलाची अधिक मदत होते. जाणून घेऊया पूजा पद्धत आणि तिथी
श्रावणी (Shravani) पिठोरी अमावस्या गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुरु होईल तर समाप्ती शुक्रवारी १५ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी होईल.
बैलपोळा हा सण या वर्षी १४ सप्टेंबर गुरुवारी साजरा करण्यात येईल. शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. वर्षभर राबण्याऱ्या बैलांविषयी शेतकरी या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो.
ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करुन गावभर मिरवणूक काढली जाते. घरात गोडाधोडाचे जेवण (Food) बनवले जाते. तसेच ज्याच्या घरी बैल नसतात ती व्यक्ती मातीच्या बैलांची पूजा करुन हा सण साजरा करतात.
हा सण महाराष्ट्रात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घातली जाते. त्यांना विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी नटवले जाते. त्यांची मनोभावे पूजा करुन पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवला जातो.
सरत्या श्रावणाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा समजला जातो. शेती व्यवसायांवर अवलंबून असणारा हा सण शेतकऱ्यांसाठी मानला जातो. ग्रामीण भागात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate) करतात. बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करतात. या दिवशी गोड-धोडाचे नैवेद्य करुन बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.