Last Shravani Somwar 2023 : शेवटचा श्रावणी सोमवार, धनप्राप्तीसाठी करा या पद्धतीने पूजा

Last Shravani Somwar Vrat : आज 11 सप्टेंबर 2023 रोजी श्रावणचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे.
Last Shravani Somwar 2023
Last Shravani Somwar 2023Saam Tv

Shravani Somwar 2023 :

भगवान महादेवाचा आवडता महिना श्रावण संपणार आहे. यंदा 17 ऑगस्टपासून सुरू झालेला श्रावण महिना 15 सप्टेंबरला संपणार आहे. आज 11 सप्टेंबर 2023 रोजी श्रावणचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. शिवभक्तांसाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो.

या दिवशी शिवभक्त शंकराचा उपवास करतात आणि त्यांची पूजा (Pooja) करतात. असे मानले जाते की श्रावण सोमवारात व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. अशा परिस्थितीत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांकडे एकच सोमवार उरला आहे. त्यामुळे या दिवशी विशेष पूजा करावी. चला जाणून घेऊया श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारी पूजा...

Last Shravani Somwar 2023
3rd Shravani Somwar 2023 : आज 4 सप्टेंबर तिसरा श्रावणी सोमवार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शिवलिंगाला ही शिवमूठ वाहा

आजची शिवमूठ

आजची शिवमूठ जव आहे. यंदा श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार आले आहेत. तसेच प्रत्येक सोमवारानुसार या सोमवारीही जव ही शिवमूठ आहे. महादेवाची पूजा करीत असताना पूजेच्या वेळी शिवमूठ अर्पण केल्याने विशेष फळ प्राप्त होते. त्यासोबत महादेवाला (Mahadev) 108 बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय हा जप बोलावा.

मुहूर्त

पंचांगानुसार 11 सप्टेंबर हा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुष्य नक्षत्र 7 वाजून 59 मिनिटापर्यंत राहील. यादिवशी परिघ योग तयार होत असल्याने हा योग रात्री 12 वाजून 12 मिनिटांपर्यंत राहील. या योगात शत्रूंवर विजय मिळवण्यात यश मिळेल असे सांगितले जाते. तसेच कौलव करण 10 वाजून 38 मिनिटापर्यंत राहील.

Last Shravani Somwar 2023
Shravani Somwar 2023 : आज श्रावणातील दुसरा सोमवार, आर्थिक प्रगतीसाठी शंकराला अर्पण करा ही शिवामूठ

शेवटच्या सोमवारी सकाळी स्नान करून भगवान शंकराची उपासना करण्याचे व्रत करा. सकाळी, शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जा किंवा घरी शिवलिंगाची पूजा करा. त्यानंतर शिवलिंगाला गंगाजल किंवा दुधाचा अभिषेक करा.

यानंतर चंदन, अक्षता, पांढरी फुले, बेलपत्र, आणि फुलांची माळ घाला. तसेच शिवलिंगाला मध, फळे, मिठाई, साखर, अगरबत्ती आणि दिवे अर्पण करा. नंतर मंत्रांचा आणि सोमवार व्रत (Vrat) कथा पाठ वाचा. शेवटी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून भोलेनाथाची आरती करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com