
Simple One Electric Scooter : आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रसिद्ध असलेली दुचाकी निर्माता कंपनी Simple Energy ने भारतात आपली Simple One ईव्ही लॉन्च केली आहे. ज्याची किंमत 1.45 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 750 वॅटच्या चार्जरसाठी 13,000 रुपये घेतले जात आहेत. तसेच या स्कूटरची डिलिव्हरी 6 जूनपासून सुरू होणार आहे.
किती आहे रेंज?
सिंपल एनर्जीचा दावा केला आहे की, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फिक्स्ड रिमूव्हेबल बॅटरीसह 212 किमीची रेंज देते. ज्यामुळे ती देशातील सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. सिंपल वन स्पीडच्या बाबतीतही पुढे आहे. (Latest Marathi News)
सिंपल वन फक्त २.७७ सेकंदात ०-४० किमी/ताशी वेग पकडू शकते, असा कंपनीचा दावा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये थर्मल मॅनेजमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी या फीचरसह आलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
कंपनीने सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन तामिळनाडूतील शूलगिरी येथील कारखान्यात सुरू केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटर पॉवरफुल 8.5kW (11.4bhp) इलेक्ट्रिक मोटरसह येते. जी 72Nm टॉर्क जनरेट करते. (Latest Auto News in Marathi)
याच्या चार्जर सिंपल लूपच्या मदतीने सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ६० सेकंदात २.५ किमी पर्यंत चार्ज होते. तर इनबिल्ट बॅटरी २.७५ तासांत ०-१०० टक्के चार्ज होते. स्टँडबाय बॅटरी ७५ मिनिटांत चार्ज होते. (Viral Video News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.