Skin Care Tips : चाळीशीत देखील तरुण दिसायचे आहे ? तर 'हे' काम अवश्य करा

त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा वापर करावा लागेल.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam TV

Skin Care Tips : अनेक महिला (Women) व पुरुषवर्ग त्वचेच्या अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. वाढत्या वयाबरोबर सुरकुत्या, डाग, त्वचेचा रंग मंदावणे हे सर्व सुरू होते.

वयाच्या चाळीशीचा टप्पा ओलाडल्यानंतर त्वचेमध्ये काही विशेष बदल दिसू लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला त्वचा पूर्वीसारखीच चमकदार, तजेलदार ठेवायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा वापर करावा लागेल.

Skin Care Tips
Skin Care Tips : ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी या सोप्या टिप्सचा वापर करा

१. त्वचा खराब होण्याची कारणे

चुकीचा आहार, धुम्रपान, ताणतणाव आणि प्रदूषण यामुळे त्वचेचा रंग अकाली बदलू शकतो. विशेषत: नोकरी करणाऱ्या महिलांना स्वत:ची काळजी घेणे थोडे कठीण जाते. वेळेच्या कमतरतेमुळे व दैनंदिन दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केल्याने त्यांची त्वचा चमकदार राहू शकते.

२. तणावापासून दूर राहा

कोणत्याही वयात सतत चिंतेत राहिल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. व्यस्त वेळापत्रकांमुळे एकाच वेळी अनेक कामे केल्यास आपण थकतो व त्याचा परिणाम हा आपल्या त्वचेवर दिसून येतो. तणावाचा तुमच्या केसांवर आणि त्वचेवरही खूप वाईट परिणाम होतो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही आनंदी असणे महत्वाचे आहे, यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकत राहते आणि तुम्हाला कोणत्याही सौंदर्य उत्पादनाची गरज भासणार नाही.

Skin Care Tips
Banana Peel Benefits : चेहऱ्याचा रंग उजवळण्यासाठी फायदेशीर ठरेल केळीचे साल !

३. नैसर्गिक फेस वॉश

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फेस वॉश अत्यंत आवश्यक आहे आणि तेही नैसर्गिक फेसवॉश. तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घेतल्यानंतर, अशा फेसवॉशची निवड करा ज्यामुळे तुमच्या त्वचेची समस्या कमी होईल, त्याचप्रमाणे पपई, काकडी यांसारख्या नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ केला तर चेहरा चमकतो व त्यावर डाग पडत नाही.

४. अँटी-एजिंग क्रीम

एका विशिष्ट वयानंतर (२५ - ३०) रात्रीच्या वेळी आपल्या सौंदर्य नियमानुसार अँटी-एजिंग क्रीम समाविष्ट करणे खूप महत्वाचे आहे. सामान्य मॉइश्चरायझरऐवजी रात्रीच्या वेळी अँटी-एजिंग क्रीम वापरा, यामुळे तुमची त्वचा तजेलदार राहिल. सुरकुत्या मुक्त, तरुण आणि गुळगुळीत त्वचा आरशात पाहण्यासाठी नियमितपणे अँटी-एजिंग क्रीम वापरा.

Skin Care Tips
Skin Care Tips : चमकदार व तजेलदार त्वचा हवी आहे ? मीरा राजपूतचे हे सौंदर्य रहस्य फॉलो करा

५. धुम्रपानाचे सेवन करणे टाळा

धूम्रपानामुळे तुमच्या त्वचेवर वृद्धत्वाची लक्षणे दिसू शकतात. धुम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्या लहान होतात, त्यामुळे त्वचेमध्ये रक्त नीट फिरत नाही, त्यामुळे तुमची त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू शकते.

६. सनस्क्रीनचा वापर

निरोगी त्वचा (Skin) हवी असेल तर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करते. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या, वयाचे डाग आणि त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्याही कमी होऊ शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com