Skin Care Tips : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, चेहऱ्याच्या सौंदर्यासोबत आरोग्यालाही होईल फायदा !

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी या तेलाचा होईल फायदा
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv

Skin Care Tips : सुंदर डागरहित चेहरा कोणाला आवडत नाही ? सुंदर दिसण्यासाठी आपण सगेळच जण प्रयत्न करत असतो. चेहऱ्यावर डाग असतील तर आपण अनेक घरगुती पदार्थांचा वापरही करतो.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना डार्क सर्कलची समस्या असते. बऱ्याचदा त्यामुळे सुंदर डोळ्यांचे रहस्य त्यामागे लपले जाते. अनेकदा हे काळी वर्तुळे लपवण्यासाठी आपण विविध पध्दतींचा वापर करतो.

Skin Care Tips
Beauty Tips : रोज मेकअप करताय ? सुंदर दिसण्यासाठी काही वेगळे करायचे आहे ? या उत्पादनांचा वापर करा

डोळ्यांखाली (Eye) येणाऱ्या काळी वर्तुळांना लपवण्यासाठी आपण अनेक महागातील पदार्थांचा वापर करत असतो. कधीकधी हे डाग लपवण्यासाठी स्त्रिया मेकअप देखील करतात परंतु, काळी वर्तुळे लपवून ठेवण्यापेक्षा त्यापासून मुक्त कसे व्हाल हे जाणून घेऊया. (Skin Care Tips In Marathi)

या काळ्या वर्तुळांपासून मुक्त होण्यासाठी आपण बदामाच्या तेलाचा वापर करु शकतो. बदामाच्या तेलात अनेक महत्त्वाचे गुणधर्म आढळतात. डोळ्यांभोवतीचा भाग खूप पातळ असतो. जेथे आर्द्रतेचा अभाव आहे. ज्यामुळे काळी वर्तुळे होतात. चला तर मग जाणून घेऊया बदामाच्या तेलाने ही काळी वर्तुळे कशी दूर करता येतील.

Almond Oil
Almond OilCanva
Skin Care Tips
Makeup Mistakes : सावधान ! मेकअप करताय तर या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा त्वचेला सुटू शकते खाज

बदामाच्या तेलाचा (Oil) जितका वापर आपण चेहऱ्यासाठी करचो तितकाच केसांसाठी देखील होऊ शकतो. बदामाच्या तेलात जीवनसत्त्व ए, ड व इ हे घटक आढळतात. तसेच यामध्ये ओमेगा ६ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात आढळते. त्यासाठी बदामाचे तेल त्वचा व केसांसाठी पोषकतत्व आहे.

Skin Care Tips
Skin Care TipsCanva

बदामाच्या तेलाचा वापर कसा करावा -

१. ऑलिव्ह ऑईल व बदाम तेल एकत्र करुन घ्या.

२. आपल्या बोटांचा पुढचा भाग तेलात बुडवा आणि काळ्या वर्तुंळाच्या भागावर लावा.

३. काळ्या वर्तुळांना हलक्या हातांनी २-३ मिनिटे मसाज करा.

४. रात्री झोपण्यापूर्वी असे केल्याने फायदा होईल. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com