Skin Care : त्वचेसाठी 'हे' पदार्थ आहे विष; वेळीच स्वत: ला रोखा, अन्यथा...

त्वचेचे सौंदर्य जपायचे असेल तर वेळीच स्वत:ला सावरला
Skin Care
Skin CareSaam Tv

Skin Care : त्वचा सुंदर व नितळ दिसण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. नव्हे नव्हे त्या टिप्स फॉलो करतो किंवा काही महागड्या उत्पादनांचा वापर करतो. परंतु, यामुळे देखील त्वचेला हवा तसा रंग मिळत नाही.

आपल्याला त्वचेवरील मुरुम, काळे डाग, सुरकुत्या इत्यादीपासून वाचवायचे असेल तर काही खाद्यपदार्थांपासून दूर राहणे चांगले. कोणत्या गोष्टी खाव्यात, ज्या त्वचेसाठी विष ठरू शकतात, हे जाणून घेऊया

१. तळलेले पदार्थ

Oily Food
Oily FoodCanva

आपल्याला बाहेरचे पदार्थ खाण्याची अधिक हौस असते त्यात तळलेले (Oil) असतील त्याची मज्जा काही औरच ! गरमागरम पकोडे, कचोरी, समोसे, पुर्‍या या सगळ्या नावाने तोंडाला पाणी सुटते. मात्र, या गोष्टी त्वचेसाठी शत्रूसारख्या असतात. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेवर मुरुम सहज होतात. विशेषत: तेलकट त्वचा असलेल्यांना असे अन्न फक्त आणि फक्त हानी देऊन जाते.

Skin Care
Skin Care Tips : रात्री झोपण्यापूर्वी 'हे' तेल लावा, चेहऱ्याच्या सौंदर्यासोबत आरोग्यालाही होईल फायदा !

२. फास्ट फूड

Fast Food
Fast FoodCanva

आजकाल फास्ट फूडचे शौकिन बरेच आहेत, यात बर्गर, पिझ्झा, फ्राईज यांसारख्या भुरळ पाडणाऱ्या गोष्टीही त्वचेसाठी शत्रू असतात. हे पदार्थ कॅलरी, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे स्त्रोत आहेत, जे त्वचेसाठी चांगले नाहीत. या गोष्टीचे सेवन केल्याने पिंपल्सची समस्या तर होतेच पण पोषक नसलेल्या या पदार्थांमुळे त्वचा (Skin) निस्तेजही होते.

३. मसालेदार पदार्थ

Spicy Food
Spicy FoodCanva

भारतीय जेवण मसालेदार नसेल तर त्याला चवच नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. जर ते मर्यादेत खाल्ले तर त्यांचा शरीराला फायदा होतो, तर त्यांचे अतिसेवन त्वचेच्या समस्यांना आमंत्रण देते. त्यापेक्षा अशा भाज्या वगैरे खाव्यात, ज्यात कमीत कमी मसाले आणि मिरचीची चव मिळेल. ज्यामुळे त्वचेला इजा होणार नाही.

Skin Care
Banana Peel Benefits : चेहऱ्याचा रंग उजवळण्यासाठी फायदेशीर ठरेल केळीचे साल !

४. चॉकलेट

Chocolate
ChocolateCanva

लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत चॉकलेट प्रत्येकाला आवडते. चॉकलेटमध्ये असलेली साखर आणि कर्बोदकांमधे कोलेजन निर्माण करते. हे केवळ सेबमचे उत्पादनच वाढवत नाही तर सुरकुत्या देखील वाढवते. चॉकलेट खायचे असेल तर डार्क चॉकलेट खा. त्याचे प्रमाणही मर्यादित ठेवा.

५. कोल्ड ड्रिंक्स

Cold Drink
Cold DrinkFood

सोडा आणि अल्कोहोल असलेले कोल्ड ड्रिंक्स ही दोन्ही अशी पेये आहेत, ज्यामुळे त्वचेला खूप नुकसान होते. ते केवळ मुरुमांना चालना देत नाहीत तर शरीराचे निर्जलीकरण देखील करतात आणि त्वचेची चमक काढून घेतात. त्यामुळे त्वचेवर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com