Skin Care Tips: स्किन केअरबाबत ही चूक महागात पडणार

काहीवेळा त्वचेच्या काळजीशी संबंधित एखादी छोटीशी चूकही मोठे नुकसान करते.
Skin Care Tips
Skin Care Tips Saam Tv

मुंबई : किचनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्वचेच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत. त्वचेची काळजी घेण्याच्या घरगुती पद्धतींमध्ये त्यांचा वापर अनेक काळापासून केला जात आहे. पण, काहीवेळा त्वचेच्या काळजीशी संबंधित एखादी छोटीशी चूकही मोठे नुकसान करते. अशा परिस्थितीत, नैसर्गिक किंवा पॅकेज उत्पादन वापरण्यापूर्वी त्याबद्दल आणि आपल्या त्वचेबद्दल काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे (Skin Care Tips do not use milk and dairy product if you have these issues).

Skin Care Tips
Skin Care Tips: मधाच्या या उपायाने दूर होईल चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्या

दूध एक लोकप्रिय स्किन केअर प्रोडक्ट आहे

त्वचेच्या काळजीबाबतीत, दूध (Milk), हळद इत्यादी अशा काही गोष्टी आहेत ज्याशिवाय नैसर्गिक किंवा पॅक केलेल्या स्किन केअर प्रोडक्टची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. घरी बनवलेले फेस पॅक असोत किंवा बाजारात उपलब्ध असलेले रेडीमेड फेस पॅक असो, त्यात दुधाचा वापर केला जातो बहुतेक केला जातो. परंतु काही प्रकरणांमध्ये, त्वचे (Skin) च्या काळजीमध्ये दुधाचा वापर केल्याने नुकसान होते. अशा परिस्थितीत, हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या लोकांनी त्वचेवर दुधाचा वापरु नये.

Skin Care Tips
Skin Care Tips: चेहऱ्यावर डाग आहेत, ग्लो येत नाहीये, हळद आणि दह्याचे हे उपाय करुन पाहा

या लोकांनी त्वचेवर दूध वापरू नये

एलर्जी

त्वचेवर कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास त्या काळात चुकूनही दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ त्वचेवर वापरु नये. यामुळे समस्या वाढू शकते.

पिंपल्स

ज्यांना पिंपल्स आहेत त्यांनी त्यांच्या त्वचेवर दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ लावू नयेत. असे केल्याने त्वचा आणखी खराब होऊ शकते.

तेलकट त्वचा

तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्यावर दुग्धजन्य पदार्थ लावू नयेत. त्यामध्ये असलेल्या फॅटी ऍसिडमुळे त्वचेवर तेलाचे उत्पादन वाढते आणि अतिरिक्त तेल त्वचेवर येत राहते. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

संवेदनशील त्वचा

ज्या लोकांची त्वचा जास्त संवेदनशील आहे, त्यांनीही चेहऱ्यावर दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ वापरु नयेत.

मुरुम

मुरुम असलेल्या चेहऱ्यावर दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ वापरल्याने बॅक्टेरियाचा संसर्ग वाढू शकतो. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com