Skin Care Tips: मधाच्या या उपायाने दूर होईल चेहऱ्यावरील मुरुम आणि डागांची समस्या

मधाचे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आले आहे.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv

मुंबई : मधाचे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं आयुर्वेदात सांगण्यात आले आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का की मध आपल्या त्वचेच्याची अनेक सर्व समस्या दूर करण्यास देखील सक्षम आहेत. मधामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे डाग, मुरुम आणि सुरकुत्या अशा सर्व समस्या दूर होतात. मध त्वचेला आतून हायड्रेट करण्याचे काम करते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते (Skin Care Tips Of Honey Solution To Many Skin Problems).

मध (Honey) हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. त्याचा वापर केल्याने त्वचेच्या छिद्रांमधील अशुद्धता बाहेर पडते. मधाचे हे उपाय नक्की ट्राय करा -

Skin Care Tips
Skin Care Tips: चेहऱ्यावर डाग आहेत, ग्लो येत नाहीये, हळद आणि दह्याचे हे उपाय करुन पाहा

त्वचा मॉइश्चराइज करण्यासाठी

हिवाळ्यात त्वचेमध्ये कोरडेपणा वाढतो. त्यामुळे मधाच्या मदतीने ही समस्या सोडवता येऊ शकते. तसेच, त्वचेवरील ताण नियंत्रित करता येतो. यासाठी चेहऱ्यावर मध लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा (Skin) मऊ होईल.

मुरुमांच्या समस्येसाठी

आयुर्वेदानुसार, मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. अशा स्थितीत मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. सामान्यत: मुरुमांची समस्या चेहऱ्यावरील रोम छिद्र, बॅक्टेरिअल ग्रोथ, जास्त तेल किंवा चिकटपणा, हार्मोनल बदल, औषधे आणि कॉस्मेटिक उत्पादने यामुळे होते.

ओपन पोअर्स

ओपन पोअर्स तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खराब करतात. त्यामध्ये घाण, तेल साचल्यामुळे पिंपल्स आणि मुरुमांची समस्याही वाढते. मधामध्ये असलेले एंजाइम त्वचेला स्वच्छ करतात आणि छिद्रांची समस्या दूर करतात. यासाठी एक चमचा मधामध्ये दोन चमचे खोबरेल तेल मिसळून स्वच्छ त्वचेवर लावा आणि सुमारे पाच मिनिटे मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड धुवा.

डागांसाठी

अनेक वेळा चेहऱ्यावर पिंपल्समुळे डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी मधही खूप प्रभावी आहे. मधामध्ये असलेले अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म डाग दूर करण्यात मदत करतात. ते त्वचा दुरुस्त करतात आणि त्वचेला तरुण ठेवतात. याचा वापर करण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा मध मिसळून दोन मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

त्वचा चमकदार बनवण्यासाठी

जर तुम्हाला त्वचेवर चमक आणायची असेल, तर कच्च्या दुधात मध मिसळा आणि कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला आवश्यक पोषण मिळेल आणि नैसर्गिक चमक येईल.

(टीप- वरील उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com