Skin care tips 'या' फळे आणि भाज्यांचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी आहे गुणकारी

फळे आणि भाज्यांच्या ताज्या रसांच्या सेवनाने वजन कमी होते. पोट, आतडे आणि मूत्रपिंड स्वच्छ करून आपली पाचन प्रणाली सुधारते.
Skin care tips 'या' फळे आणि भाज्यांचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी आहे गुणकारी
Skin care tips 'या' फळे आणि भाज्यांचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी आहे गुणकारी

फळे (Fruits) आणि भाज्यांचे (Vegetables) ताजे रस पिण्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहेत. दररोज एक ग्लास रस तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करतो. त्याचबरोबर हे आरोग्याच्या अनेक समस्यांवरही मात करण्यासही मदत करते. फळे आणि भाज्यांच्या ताज्या रसांच्या सेवनाने वजन कमी होते. पोट, आतडे आणि मूत्रपिंड स्वच्छ करून आपली पाचन प्रणाली सुधारते. आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय ताज्या रसांच्या सेवनाचा आणखी एक फायदा आहे. याशिवाय त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सुंदरतेसाठीही ताजी फळे आणि भाज्यांचा रस अधिक गुणकारी आहे.

हे देखील पहा-

टोमॅटोचा रस : टोमॅटोच्या रसामध्ये लाइकोपीन असते, जे अँटीऑक्सिडेंट आहे. हे सनस्क्रीन म्हणून काम करते. दररोज एक ग्लास टोमॅटोचा रस पिऊन तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. हे वृद्धत्व आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यामुळे तुमची त्वचा थंड राहते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असल्याने त्याचा रस त्वचेसाठीच नव्हे तर आपल्या शरीरासाठी देखील उत्तम आहेत.

काकडीचा रस - काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे काकडी अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे. काकडीमध्ये के, ए आणि सी जीवनसत्वे असतात. काकडीमध्ये सुमारे 95 टक्के पाणी असते. हे हायड्रेशनसाठी उत्तम आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी ते खाणे आवश्यक आहे. निरोगी त्वचेसाठी काकडीचा रस नियमित वापरला जाऊ शकतो.

Skin care tips 'या' फळे आणि भाज्यांचा ज्यूस त्वचेच्या आरोग्यासाठी आहे गुणकारी
Allergy पासून मुक्तता मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

बीटचा रस - निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही बीटरूटचा रस पिऊ शकता. त्यात कॉपर आणि पोटॅशियमसह जीवनसत्त्वे ए, सी आणि के मुबलक प्रमाणात असतात. हे डाग कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार होते.

लिंबाचा रस - त्वचेच्या आरोग्यासाठी लिंबू सर्वात उत्तम पर्याय आहे. लिंबूमधील व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी उत्तम क्लीन्झरचे काम करते. हे पीएच पातळी संतुलित राखण्यास मदत करते. तसेच त्वचा चमकदार बनवते. यासाठी रोज सकाळी एका ग्लास कोमट पाण्यात एका लिंबाचा रस पिळून घ्या आणि प्या.

सफरचंदाचा रस - दररोज एक सफरचंद डॉक्टरांकडे जाणे बंद, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. म्हणजेच सफरचंद केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या सौदर्यांसाठीही गुणकारी आहे. सफरचंदचा रस तुम्हाला कोरड्या त्वचेपासून वाचवू शकतो. यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे वृद्धत्वाची चिन्हे कमी करतात. त्यामुळे नितळ आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी दररोज किमान एक ग्लास रस पिण्यास विसरू नका.

गाजराचा रस-गाजराचा रस व्हिटॅमिन ए ने समृद्ध असतो. गाजरात अँटी-ऑक्सिडेंट असतात. गाजराचा रस नियमित प्यायल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com