सावधान! पावसाळ्यात ओले अंतर्वस्त्र परिधान करताय ? त्वचारोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

अंतर्वस्त्रे मात्र तशीच ओली राहतात. ओल्या अंतर्वस्त्रांमुळे त्वचेवर फंगल तयार होऊन त्वचारोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर नागरिकांना त्वचारोग (Skin Diseases) तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे
Skin Diseases News
Skin Diseases News saam tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : सध्या पावसाळ्याचा (Rain) ऋतू सुरू असून पावसात भिजल्याने अंगावरील कपडे पूर्णतः ओले होतात. अशावेळी बाह्य वस्त्र तर काही वेळाने सुकतात. मात्र अंतर्वस्त्रे मात्र तशीच ओली राहतात. ओल्या अंतर्वस्त्रांमुळे त्वचेवर फंगल तयार होऊन त्वचारोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर नागरिकांना त्वचारोग (Skin Diseases) तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. ( Skin Diseases News)

Skin Diseases News
Fashion tips : तरुणींनो, कॉलेजला जाताय तर या आउटफिट्सची चॉइस विचारात घ्या

'सर्वाधिक दुर्लक्ष आपण ओल्या अंतर्वस्त्रांवर करतो. मात्र त्याठिकाणी शरीराचा घाम लागून खाज येणे, पुरळ उठणे तसेच लाल चट्टे पडणे असे प्राथमिक लक्षणे नागरिकांना जाणवतात. त्यामुळे 100, 200 रुपये खर्च करून भिजल्यावर अंतर्वस्त्र बदली करावीत अन्यथा त्वचा रोग तज्ञांकडे हजारो रुपये खर्च होऊ शकतात. सामान्य पणे अधिक अंतर्वस्त्र स्वतःजवळ बाळगणे, ओले अंतर्वस्त्र त्वरित बदली करणे, सकाळी अंगजोल झाल्यावर अंतर्वस्त्र घालण्याआधी त्यांना आपल्या बाह्य वस्त्रांप्रमाणे इस्त्री करावी. जेणे करून त्वचा रोग होण्यापासून आपण आपला बचाव करू शकतो, असा सल्ला त्वचारोग तज्ञ डॉ. गौतम देठे यांनी दिला.

'यासोबतच मागील ४-५ वर्षात भारतात त्वचा रोगाचे प्रमाण वाढले असून नवीन स्ट्रेन निर्माण झालेत जे अधिक आक्रमक आणि घातक आहेत. अनेक नागरिक डॉक्टरकडे न जाता मेडिकलमधून औषध घेऊन इलाज करतात. मात्र, हा इलाज अधिक धोकादायक ठरू शकतो. कारण त्या औषधांमध्ये असणाऱ्या स्टुराईडमुळे क्षणिक बरे वाटेल. मात्र, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे त्वचारोग झाल्यास तात्काळ त्वचा रोग तज्ञांचाच सल्ला घ्यावा, डॉ. गौतम देठे असेही म्हणाले.

Skin Diseases News
Hair care tips : केस सतत गळताय, या पाण्याने केस धुतल्यास मिळतील अनेक फायदे !

सध्या जनरल फिजिशियनकडे त्वचारोग झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून याचे मुख्य कारण ओले अंतर्वस्त्र परिधान करणे हे असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जनरल फिजिशियन डॉ. शिवदास भोसले यांनी केले आहे. दरम्यान, एकूणच ओले अंतर्वस्त्र परिधान करून राहणे त्वचेसाठी हानिकारक असून शंभर दोनशे रूपयांसाठी हजारो रुपयांचा त्वचा रोग कशासाठी या प्रश्नांचा नागरिकांनी गंभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com