
Sleeping Problem : हल्ली झोप न लागणं ही अनेक लोकांची समस्या बनली आहे. ज्याला निद्रानाश असे म्हणतात आणि जे अनेक आजारांना निमंत्रण ठरु शकते. परंतु, या काही गोष्टी केल्यास तुम्हाला अगदी अंथरुणावर पडल्या-पडल्या झोप लागू शकते.
उत्तम झोप हा निरोगी आयुष्याचा कानमंत्र आहे. झोपेचे अनेक फायदे आहेत. चांगली झोप तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तणाव दूर करण्यास मदर करते. झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), हृदयविकार, वाईट मनस्थिती, तणाव इ. आजार होण्याची शक्यता असते. अनेक लोक रात्री लवकर झोप न लागण्याच्या समस्येला सामोरे जातात. तुम्हालाही खूप वेळ अंथरुणात पडून देखील झोप (Sleep) लागत नाही? तर जाणून घेऊया या समस्येवरील उपाय
त्वरीत झोप लागण्यासाठीचे उपाय (Solution) :
1. झोपेत शरीराचे तापमान कमी होते त्यामुळे ज्या जागी झोपणार आहोत ती खोली हवेशीर असायला हवी. यामुळे शरीराचे तापमान कमी होते आणि लवकर झोप येण्यास मदत होते.
2. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचे तापमान काही काळासाठी वाढते परंतु जसं-जसे तापमान कमी होते, तशी झोप येऊ लागते.
3. योग साधना हा लवकर झोप येण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आहे. बेडवर झोपून आपले ध्यान शरीराच्या प्रत्येक भागावर काही काळासाठी एकाग्र करून तुम्ही अंथरुणातच योगनिद्रा करू शकता.
4. लवकर झोप लागण्यासाठी मोबाइल, लॅपटॉप वा इतर उपकरणांना आपल्यापासून दूर ठेवले पाहीजे. ही उपकरणे तुमचे लक्ष विचलीत करण्याचे काम करतात. त्याचबरोबर झोपताना खोलीतील सर्व दिवे बंद करून झोपा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.