Uses of sleeping eye mask : स्लिपिंग आय मास्क लावून झोपल्यास डोळ्यांचा प्रकाशापासून होईल बचाव

स्लीप मास्कचा वापर कसा करावा
Sleeping eye mask, Benefits, uses of sleeping eye mask
Sleeping eye mask, Benefits, uses of sleeping eye maskब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपले शरीर थकल्यामुळे आपल्या झोपेची अधिक आवश्यकता असते. परंतु, झोप व्यवस्थितरित्या झाली नाही तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

हे देखील पहा -

रात्री चांगली झोप मिळवण्यासाठी आपल्याला आपली खोली पूर्णपणे अंधारलेली आहे याची खात्री करणे, परंतु हे नेहमीच शक्य नसते. आपल्या घरातील बहुतेकांना लाईट हवी असते तर आपल्याला झोपायचे असल्यामुळे आपण ती बंद करण्याचा प्रयत्न करतो. डोळ्यांवर येणारा प्रकाश हा तेव्हा आपल्याला असंख्य वेदना देतो. अशावेळी आपण स्लीप मास्कचा वापर करु शकतो यामुळे आपल्याला डोळ्यांवर येणारा अतिरिक्त प्रकाश रोखता येईल तसेच आपल्या झोपही शांत लागेल. या स्लीप मास्कचा फायदा कसा होईल हे जाणून घ्या.

१. खोलीतील प्रकाश नियंत्रणात असेल तर आपण आपल्या झोपेच्या अनेक तक्रारी सुधारु शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की आपल्या सर्कॅडियन लयवर प्रकाशाचा परिणाम होतो. ज्यावेळी प्रकाश आपल्या डोळ्यांना (Eye) सहन होणार नाही तेव्हा आपण रात्री झोपताना स्लीप मास्कचा वापर करायला हवा. दिवसभर आपण फोन, लॅपटॉप (laptop) सारख्या प्रकाशात अतिरिक्त काम करत असल्यामुळे आपल्या डोळ्यांवर याचा परिणाम होतो यासाठी स्लीप मास्क फायदेशीर ठरेल.

Sleeping eye mask, Benefits, uses of sleeping eye mask
Home Remedies : रुपयात मिळणाऱ्या तुरटीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे

२. काम करताना आपल्याला सतत झोप येत असेल किंवा आपली झोप पूर्ण होत नसेल तर आपण स्लीप मास्कचा वापर करायला हवा. बरेचदा आपले डोळे बंद असूनही आजूबाजूचा आवाज ऐकू येतो यामुळे आपल्याला झोप लागत नाही. अशावेळी आपण स्लीप मास्कचा वापर केल्यास झोप पूर्ण होण्यास मदत होईल.

३. स्लीप मास्कमुळे डोळ्यांवर येणारा प्रकाश कमी करण्यास मदत होतो. ज्यामुले आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते. आपल्या शरीरातला थकवा दूर करण्यासाठी, उती दुरस्त करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी आपण गाढ झोपणे आवश्यक आहे. यामुळे झोपेच्या अनेक समस्येपासून आराम मिळतो.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com