छोट्या-छोट्या चुकांमुळे होतो पिग्मेंटेशनचा त्रास

पिग्मेंटेशन कशामुळे होते हे जाणून घ्या
छोट्या-छोट्या चुकांमुळे होतो पिग्मेंटेशनचा त्रास
pigmentation problem, skin care problemब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सौंदर्य हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अंग आहे. त्याची काळजी घेण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. परंतु, सतत मुरुमाच्या समस्येने त्रस्त असण्याचे कारण फक्त ऊन नव्हे तर हायपर पिग्मेंटेशन,औषधे, कॉसमेटिक्स किंवा हार्मोन्समधील बदल यामुळे देखील पिग्मेंटेशन होऊ शकते.

हे देखील पहा-

पिग्मेंटेशन चेहऱ्याचे तेज संपवणारी समस्या आहे. आपल्याकडून होणाऱ्या दैनंदिन छोटयाछोट्या चुका एक मोठी समस्या बनून जाते. त्यामुळे वयही जास्त दिसू लागते. या चुका कोणत्या व कशा टाळता येऊ शकतात ते पाहू. तसेच कुठल्याही वयात पिग्मेंटेशनची समस्या निर्माण होऊ शकते. पिग्मेंटेशन कसे होते हे जाणून घेऊया.

१. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल की, घरात लावलेले फ्लोरोसेंट लाइट्स आणि आर्टिफिशियल लाइट्स खूप जास्त एक्स्पोज होत असतो. हाच प्रकाश त्वचेसाठीही हानिकारक असतो. तेच लॅपटॉप, टॅब, फोन स्क्रीन, बल्च इ. वस्तू त्वचेचे हायपर पिग्मेंटेशन जास्त उभारतात.

pigmentation problem, skin care problem
चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरेल ही औषधी वनस्पती !

२. आपली स्किन (Skin) बॅक्टेरिया व इतर एखाद्या पोल्यूटेंट कारणामुळे मळते. ती स्वच्छ करणे आवश्यक असते. गरजेपेक्षा जास्त एक्सफोलिएशन हायपर पिग्मेंटेशनचे कारण होऊ शकते. ड्राय स्किन असणाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा, तर ऑयली स्किनसाठी आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशन पुरेसे असते.

३. सतत चेहऱ्यावर मुरुमे येत असतील आणि आपण ती फोडत असू तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हायपर पिगमेंटेशनची समस्या वाढते आणि चेहऱ्यात गालांवर, कपाळावर वेगवेगळ्या जागी डार्क स्पॉट्स येतात. यासाठी कधीही यांना टच करू नये. मुरुमे फोडल्यामुळे हायपर पिग्मेंटेशन आणि स्पॉट्सची समस्या निर्माण होते.

४. सनस्क्रीन घरातही लावायला हवे. डोळ्यांखाली (Eye) हे विशेष करून लावले जायला हवे. जेणेकरून आपल्या चेहऱ्याच्या सेन्सेटिव्ह स्किनवर कोणतेही डाग दिसू नये. सनस्क्रीनचा वापर व्यवस्थित न करणे सनबर्न व पिग्मेंटेशनची समस्या सर्वांत जास्त वाढवू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com