Smartphone Lost : तुमचा फोन देखील चोरीला गेलाय ? IMEI नंबरवरुन अशाप्रकारे करा ट्रॅक !

फोन चोरीला किंवा हरवला की अनेक समस्या निर्माण होतात.
Smartphone Lost
Smartphone LostSaam Tv

Smartphone Lost : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. मुलांच्या शाळेपासून (School) ते कामाच्या अनेक ठिकाणी याचा वापर सर्रास केला जातो. जगभरात ९९ टक्के लोक हे स्मार्टफोनचे वापरकर्ते आहेत.

स्मार्टफोनच्या वापरापासून अगदी रिकाम्या वेळीत त्याच्यावर व्हिडीओ पाहाणे किंवा गेम खेळले जातात. पण, फोन चोरीला किंवा हरवला की अनेक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुमची वैयक्तिक माहितीही लीक होऊ शकते. जीपीएस लोकेशन, सिमकार्ड किंवा इंटरनेट अॅक्सेस नसलेला फोन शोधणे अवघड काम आहे.

Smartphone Lost
Technology : Smartphone मधून फोटोज् आणि व्हिडिओ झाले डिलीट, याप्रकारे करा रिकव्हर

पण, अशा परिस्थितीत आयएमईआय नंबरचा आपल्याला फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्याला वापर असलेल्या फोनचा आयएमईआय नंबर लक्षात असणे गरजेचे आहे. आपला फोन हरवल्यास, तुम्ही याच्या मदतीने मोबाईल ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू शकता.

IMEI नंबर म्हणजे काय?

  • सर्व फोनमध्ये 15 अंकी IMEI किंवा आंतरराष्ट्रीय मोबाइल ओळख क्रमांक असतो. हा युनिक नंबर कोणत्याही फोनसाठी बदलता येणार नाही.

  • तुम्ही फोनच्या बॉक्सवर ते तपासू शकता. याशिवाय तुम्ही फोनच्या सेटिंगमध्ये जाऊनही ते तपासू शकता. तुम्ही *#06# डायल करून IMEI नंबर देखील शोधू शकता.

फोन चोरीला गेल्यास, या गोष्टींची आवश्यकता भासेल

  • IMEI क्रमांक

  • चोरी झालेल्या फोनची FIR प्रत

  • मोबाइलचे इतर तपशील जसे की ब्रँड, मॉडेल आणि बिलिंग इनव्हॉइस हे काम करतात

  • फोन (Phone) चोरीला गेल्यावर सर्वात आधी जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती द्या. यानंतर PC वर CEIR https://ceir.gov.in/Home/index.jsp# च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सध्या ही सेवा दिल्ली, महाराष्ट्र आणि कर्नाटकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • CEIR च्या अधिकृत वेबसाइटवर, मोबाइलचे सर्व तपशील जसे की ब्रँड, मॉडेलचे शेवटचे लोकेशन प्रविष्ट करा.

  • येथे तुम्हाला मोबाईलचे बिलिंग इनव्हॉइस देखील द्यावे लागेल. त्यानंतर पर्यायी क्रमांक टाका आणि Get OTP बटणावर क्लिक करा

  • हरवलेल्या किंवा 'चोरलेल्या' फोनची विनंती पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला पर्यायी क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी मिळेल. याचा वापर IMEI क्रमांक अनब्लॉक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • फोनचा गैरवापर टाळण्यासाठी, तुम्ही चोरी झालेल्या फोनबद्दल नेटवर्क ऑपरेटरला देखील कळवावे. याशिवाय, IMEI नंबर ब्लॉक करण्याची विनंती देखील करु शकता.

  • सीईआयआर वेबसाइटच्या मदतीने तुम्ही चोरीला गेलेल्या फोनची स्थिती आणि पोलिस तपास करु शकता. फोन स्वतः ट्रॅक केला जाऊ शकत नाही. फोन मिळाल्यानंतर तुम्ही IMEI नंबर ब्लॉक करू शकता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com