Smartphone Sale : 10 हजाराच्या आत मिळताय 'हे' 3 नवे फोन, आजच कार्टमध्ये अॅड करा

आपल्याला जर 10 हजारांपेक्षा कमी किमतीत चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर 2 डिसेंबरची वाट पाहावी लागेल.
Smartphone Sale
Smartphone SaleSaam Tv

Smartphone Sale : फोन वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीचा सेल संपल्यानंतरही अनेक साईट्स आपल्याला कमी किंमती नवीन फोन देत असतात. आपल्या हवा असणारा नवीन फीचर्स व अपडेटचा फोन मिळत आहे.

आपल्याला जर 10 हजारांपेक्षा कमी किमतीत चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर 2 डिसेंबरची वाट पाहावी लागेल. रात्री 12 नंतर हे फोन उपलब्ध होणार आहे. याची किंमत फक्त रु.9,299 पासून सुरू होते. जाणून घ्या, या फोनची वैशिष्ट्ये आणि कोणता स्वस्त फोन तुमच्या जुन्या फोनला टक्कर देईल

Smartphone Sale
Smart Tips: टूथपेस्टने हटवा मोबाईल स्क्रीनवरचे स्क्रॅचेस; पण 'ही' काळजीही घ्या...

1-Lava Blaze Next

 • बॅक ग्लास डिझाइन असलेल्या या फोनची किंमत 9,299 रुपयांपासून सुरू होते. हा फोन 2 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

 • फोनमध्ये 13MP ट्रिपल रिअर कॅमेरा तसेच 8MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी एका चार्जवर पूर्ण दिवस टिकते.

 • फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+IPS डिस्प्ले तसेच 4GB RAM आहे, ज्यामध्ये 3GB व्हर्च्युअल रॅम उपलब्ध असेल. फोनमध्ये 64GB स्टोरेज आहे

 • फोनमध्ये MediaTek G37 Octa कोर प्रोसेसर आहे. हा फोन ब्लू आणि रेड कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

2. Samsung Galaxy M13

 • Amazon वर Samsung Galaxy M13 फोन देखील कमी दरात मिळत आहे. फोनची किंमत 14,999 रुपये आहे परंतु ऑफरमध्ये (Offer) 30% डिस्काउंटनंतर तो 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

 • फोनवर 1000 रुपयांचा कॅशबॅक आहे, त्यानंतर तुम्ही तो 9,499 रुपयांना खरेदी करू शकता. फोनवर 10,499 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.

 • या फोनमध्ये 6.6-इंचाची स्क्रीन आहे ज्याचा डिस्प्ले HD + LCD पॅनेल आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा आहे.

 • फोनच्या कॅमेऱ्यात ऑटोफोकसची सुविधा देखील आहे. फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

3. Redmi A1

 • स्वस्त फोनमध्ये, या 2 फोनला रेडमीच्या नवीन लाँच फोनची (Phone) टक्कर मिळू शकते. Redmi A1 फोनची किंमत 8,999 रुपये आहे परंतु डीलमध्ये 30% सूट मिळाल्यानंतर, तो 6,299 रुपयांना उपलब्ध आहे.

 • या फोनवर 600 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट कूपन आहे आणि 5,950 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.

 • या फोनची वैशिष्ट्ये लावा ब्लेझ नेक्स्टपेक्षा कमी आहेत. फोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे.

 • फोनमध्ये 6.52 इंचाचा HD डिस्प्ले आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे.

 • फोनमध्ये ड्युअल एआय कॅमेरा आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 8MP आहे आणि सेल्फी कॅमेरा 8MP आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com