How Take Care of Health In Changing Environment : कधी ऊन तर कधी पाऊस... कशी घ्याल बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी? जाणून घ्या

Changing Weather Health Care : कोरोनाचं आणि इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चं संकट डोक्यावर असताना असा बिनमोसमी पाऊस आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा डॉक्टर्स करत आहेत.
How Take Care of Health In Changing Environment
How Take Care of Health In Changing Environment Saam Tv

Health Care In Changing Weather : राज्यात कधी ऊन तर कधी पाऊस सुरू आहे. कोरोनाचं आणि इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चं संकट डोक्यावर असताना असा बिनमोसमी पाऊस आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा डॉक्टर्स करत आहेत. त्यामुळं या पावसात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. या पावसामुळं होणारे आजार (Disease) टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

सध्या महत्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट आहे. त्यात नवीन व्हेरियंटचा धसका सर्वांनी घेतला आहे. त्यामुळं या पावसानं आजारी न पडण्याची काळजी आपण घ्यायची आहे. ज्या लोकांची शारीरिक क्षमता मजबूत आहे.

त्यांच्यातील हा विषाणू लवकर हल्ला करत नाही. म्हणूनच या विषाणूपासून आणि या वातावरणात आपल्या आरोग्याचा (Health) बचाव करण्यासाठी तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता मजबूत करावी लागेल, तरच तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

How Take Care of Health In Changing Environment
Climate change Effect on Health : उन्हाळा सुरु होण्याआधीच वाढल्या आरोग्याच्या समस्या, कशी घ्याल काळजी

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा एकदा वाढत आहे. इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चे रुग्ण भारतात हळूहळू भेटू लागले आहेत. हा विषाणू वेगाने पसरत आहे. त्याची लक्षणेही कोरोनासारखी (Corona) आहेत. ताप आणि खोकला सह फ्लू विषाणू याला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी सरकारकडून सूचनाही जारी करण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे आणि त्याचबरोबर त्यांना कोविडच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, इन्फ्लूएंझा विषाणू नाक, डोळे आणि तोंडातून पसरतो. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब इत्यादी त्याची लक्षणे आहेत.

नेमकी काय काळजी घ्यावी -

सर्दी, खोकला -

अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.

दमा -

ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.

जुलाब -

पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.

How Take Care of Health In Changing Environment
Summer Health Care : उन्हाळ्यात सतत तहान लागते? वजनही वाढतेय? डाएटमध्ये सामील करा हे 5 ड्रिंक्स

आहार विषयक काळजी -

दालचिनी -

दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. ते तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप मदत करते. हे अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे आणि धोकादायक रेणू आणि मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते. ते शरीरात कोणताही विषाणू वाढू देत नाही.

मेथीचे दाणे -

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असल्याचे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. हे संयुगे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवतात, जे संक्रमण आणि रोगांशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेद आणि इतर पारंपारिक औषध पद्धतींमध्ये मेथीच्या बियांचा वापर केला जातो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सारखे पोषक घटक असतात. यासोबत लोह, जस्त आणि सेलेनियम सारखी खनिजेही त्यात आढळतात.

How Take Care of Health In Changing Environment
Health Care Tips : कोलेस्ट्रॉल, हाय बीपीपासून मिळेल आराम फक्त हा चहा प्या!

आले -

आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. हे बर्याचदा खोकला आणि घसा दुखण्यासाठी वापरले जाते. संसर्ग दूर करण्यासाठी आले खूप महत्वाचे आहे. आले रोगांशी लढण्याची क्षमता देते. अदरकमध्ये अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात.

हळद -

हळद हे अन्नामध्ये खूप शक्तिशाली मानले जाते कारण हळदीमुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे संक्रमण आणि रोगांशी लढण्याची क्षमता देखील देते.

लवंग -

लवंगात अशी अनेक संयुगे आढळतात जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. जसे की युजेनॉल. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ते बॅक्टेरिया आणि विषाणूंना वाढण्यापासून रोखतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com