दिवसाची सुरुवात या टेस्टी मिल्कशेकने करा !

दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रायफ्रुट्स मिल्क शेकने होत असेल तर वेगळीच बाब आहे.
दिवसाची सुरुवात या टेस्टी मिल्कशेकने करा !
Breakfast recipe, Milkshake Recipe, Breakfast recipe idea ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या दिवसाची सुरुवात एनर्जीने भरलेली असावी असे प्रत्येकाला वाटत असते. आपण नाश्ता भरपूर प्रमाणात केला तर आपल्याला दिवसभर भूक लागत नाही.

हे देखील पहा -

दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रायफ्रुट्स मिल्क शेकने होत असेल तर वेगळीच बाब आहे. आपण ड्रायफ्रुट्सचा मिल्क शेक नाश्त्यात घेतला तर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल व दीर्घकाळ आपले पोट भरल्याचाही अनुभव येईल. हा ड्रायफ्रुट्स मिल्कशेक चवीसाठी जितका टेस्टी आहे तितकाच तो शरीरासाठी (Health) देखील चांगला आहे. नाश्त्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याऐवजी आपल्यासाठी मिल्क शेक हा उत्तम पर्याय असू शकतो.

ड्राय फ्रुट्स मिल्क शेक साठी साहित्य

दूध - २ कप

साखर - २ मोठे चमचे

मलई - १ मोठा चमचा

काजू - ७-८

बदाम - ७-८

पिस्ता - ७-८

अंजीर - ७-८

थंडाई मसाला- १ मोठा चमचा

केशर काड्या- २ ते ३

पाणी (Water) - १ मोठी वाटी

Breakfast recipe, Milkshake Recipe, Breakfast recipe idea
पावसाळ्यात डिहायड्रेटच्या समस्येपासून सुटका कशी मिळवाल ?

कृती -

ड्रायफ्रुट्स मिल्क शेक बनवण्यासाठी काजू, बदाम, पिस्ता, अंजीर घेऊन १ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाण्यातून भिजवलेले ड्रायफ्रुट्स बाहेर काढा. आता मिक्सरमध्ये साखर आणि भिजवलेले ड्रायफ्रूट्स बारीक करुन घ्या. या मिश्रणात दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या, शेक तयार होईल. आता मिक्सरमध्ये मलई घालून पुन्हा हळूहळू फिरवून घ्या. नाहीतर त्याचे गोळे जमतील. तयार मिल्क शेक ग्लासमध्ये (Glass) काढून त्यात थंडाई मसाला टाका. चांगले ढवळून घ्या. ड्रायफ्रुट्स मिल्क शेक तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी ग्लासमध्ये बारीक चिरलेल्या ड्रायफ्रूट्स व केशर घालून सजवून घ्या.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com